Mahaprbodhan Rally In Beed News Sarkarnama
मराठवाडा

Beed News : मराठवाड्यात पुन्हा महाप्रबोधन यात्रा, २० रोजी राऊत, अंधारे बीडमध्ये..

सरकारनामा ब्युरो

Maratwhwada : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल, कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आक्रमक झाली आहे. राज्यात पुन्हा आघाडीच्या वज्रमुठ सभा सुरू होणार आहेत, तसेच ठाकरे गटाकडूनही महाप्रबोधन यात्रा नव्याने सुरु केल्या जाणार आहेत. येत्या २० मे रोजी बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा होणार आहे.

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, (Sanjay Raut) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थीतीत होणाऱ्या या यात्रेची जय्यत तयारी ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू आहे. (Shivsena) राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार व शिवसेनेतून फुटून सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनेकांच्या मतदारसंघात ठाकरे गटाकडून शिवसंवाद, महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जात आहे.

आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांच्या या शिवसंवाद आणि महाप्रबोधन यात्रेचा पहिला टप्पा याआधी मराठवाड्यात झाला होता. (Beed) आता पुन्हा महाप्रबोधन यात्रा मराठवाड्यात सुरू करण्यात येणार आहे. बीड येथे २० मे रोजी ही महाप्रबोधन यात्रा होणार आहे. याची तयारी जोरात सुरु असून सोमवारी (ता. १५) जिल्हासंपर्क प्रमुख धोंडू पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.

जिल्हाप्रमुख अनिल जगताप, आप्पासाहेब जाधव, माजी आमदार सुनील धांडे, विलास महाराज शिंदे आदींच्या उपस्थितीत महाप्रबोधन यात्रे संदर्भात काही सूचना देण्यात आल्या. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेत मार्गदर्शन करणार आहेत.

राऊत पहिल्यांदाच बीडमध्ये येत असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत याआधी बीडमध्ये `देता की जाता`, आंदोलन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर ही प्रबोधन यात्रा देखील होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, महाप्रबोधन यात्रेच्या प्रसार आणि प्रचारासाठी सहा रथ तयार करण्यात आले असून त्याचे अनावरणही यावेळी करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT