Girish Mahajan Sarkarnama
मराठवाडा

Girish Mahajan : नारायणगडाच्या विकास निधीसाठी गिरीश महाजनांच्या दारात गेल्यानंतर मिळाले आश्वासन

Datta Deshmukh

Beed News : श्री क्षेत्र नारायणगडाचे नाव आपण खूप वर्षांपासून ऐकून आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातून याठिकाणी भाविक येतात. त्यामुळे गडासाठी विकास आराखड्यातील उर्वरित निधी तातडीने देऊन टाकतो, असा शब्द राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विश्वस्तांना दिला. शिवाय संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून पुढील कार्यवाही आजच सुरू करा, असे निर्देशही गिरीश महाजन यांनी दिले.

महाराष्ट्रातील (Maharashtra) धाकटी पंढरी अशी ओळख अससलेल्या परिसरातील श्री क्षेत्र नारायणगडावर (Narayangad) विविध विकास कामांसाठी २५ कोटींचा आरखडा पुर्वीच मंजूर करण्यात आला असून यातील दोन कोटी रूपये प्राप्त झालेले आहेत. गडाच्या विश्वस्तांनी मंगळवारी (ता. २) महाजन (Girish Mahajan) यांची मंत्रालयात भेट घेऊन, उर्वरित निधी मागणीचे निवेदन दिले.

श्री क्षेत्र नारायणगडाचे विश्वस्त मंत्रालयातील गिरीश महाजन यांच्या दालनात पोचले. महाजनांना मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदन पाहताच गिरीश महाजन म्हणाले, 'गडासाठीचा उर्वरित निधी देऊन टाकतो'. श्री क्षेत्र नगद नारायण गडाच्या विकासाठी २०१८ मध्ये २५ कोटी रूपयांच्या विकास आरखड्यास मंजुरी दिलेली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आराखडा मंजूर करुन गडावर विकास कामांचे भूमिपूजनही केले होते. त्यावेळी दिवंगत लोकनेते विनायक मेटे व तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी निधीसाठी पाठपुरावा केला होता. यातील दोन कोटी रूपये आजवर प्राप्त झाले असून यातून गडावर बांधकाम झालेले आहे.

उर्वरित निधी मिळावा, यासाठी कोरोना काळापासून गडाचे महंत शिवाजी महाराज, कृषिमंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक विश्वस्त मंडळ प्रयत्न करत आहे. याबाबत मंगळवारी विश्वस्त अनिल जगताप, बळीराम गवते, बी. बी.जाधव, गोवर्धन काशीद, अशोक सुखवसे आदींनी मंत्रालयात महाजन यांच्यासोबत विकास व निधीबाबत चर्चा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT