Nashik Political News : राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याविरोधात हिंदुत्ववादी आक्रमक..!

NCP's Jitendra Awhad controversy statement about lord Ram : पोलिसांत गुन्हा दाखल करणार ; प्रभू श्रीरामांबद्दल वक्तव्य करुन दिला ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना मुद्दा...
NCP
NCPSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : आक्रमक शैली, वादग्रस्त विधाने आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे एक समीकरण बनले आहे. आता त्यांच्या विरोधात नाशिक मधील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत एकत्र झाल्या आहेत. या संदर्भात आज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वक्तव्य केले.

या वक्तव्यांमुळे भाजप (BJP) सोबत जवळीक असलेल्या आणि हिंदुत्ववादी संघटनांना एक मुद्दा मिळाला आहे. यावरून आता राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. नाशिक (Nashik) शहरातील पुरोहित, आखाडा परिषद आणि हिंदुत्ववादी संघटना आव्हाड यांनी केलेल्या विधानामुळे संतप्त झाले आहेत. आज पंचवटी येथील काळाराम मंदिरात ही सर्व मंडळी एकत्र येऊन जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा निषेध करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

NCP
Chhagan Bhujbal On Awhad : आव्हाडांना मी मंत्री केलं, आता ते उपकार विसरले; छगन भुजबळांनी घेतला समाचार

याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा होण्याआधी हिंदुत्ववादी संघटनांना आयता मुद्दा मिळाला आहे. आव्हाड यांनी शिर्डी येथे केलेल्या विधानाचे पडसाद कालच म्हटले होते.

या वादग्रस्त विधानामुळे समविचारी राजकीय नेते तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील भिन्न मते मांडली होती. ठाणे येथे श्री आव्हाड यांच्या निवासस्थानी काही कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला होता. याबाबत पुरोहित संघ, आखाडा परिषद, सकल हिंदू समाज संघटना आज गुन्हा दाखल करतील असे सुधीरदास पुजारी आणि अनिकेतशास्त्री देशपांडे या महंतांनी सांगितले.

यानिमित्ताने राज्याच्या राजकारणात भाजप आणि त्यांच्या समर्थकांना आव्हाड यांनी एक नवा राजकीय मुद्दा पुरविल्याची चर्चा आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत अशा परिस्थितीत आव्हाड यांनी केलेल्या विधानाचा राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस शरद पवार गटाला फायदा होतो की, ते टीकेचे धनी होतात हे लवकरच स्पष्ट होईल.

(Edited by Amol Sutar)

NCP
Kailas Patil : शेतकऱ्यांच्या थकीत पीक विम्यासाठी कैलास पाटलांनी घेतली कृषी आयुक्तांची भेट, म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com