Bajrang Sonawane Contacted Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Bajrang Sonawane: वडील मारतील, बायको नाश्ता देणार नाही, असे बीडचे 'बाप्पा'का म्हणाले...

MP Bajrang Sonawane Contacted Ajit Pawar Said Amol Mitkari: जर माझ्यासारखा एखादा खासदार इकडून निवडून येऊन तिकडे गेला तर त्याला पब्लिक तर मारेलच पण माझे वडील देखील मारतील, अशी संतप्त प्रतिक्रिया सोनवणे यांनी दिली आहे.

Mangesh Mahale

Beed News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांना फोन केला होता, असा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात आहेत, असे सांगत खळबळ उडवून दिली होती.

यावर बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. मिटकरी हे अजितदादांच्या (Ajit Pawar) बंगल्यावरचे ऑपरेटर आहेत का? असा संतप्त सवाल करीत सोनवणे यांनी मिटकरी यांच्यावर पलटवार केला आहे.

शरद पवार यांचे 8 खासदार निवडून आले आहेत. जर माझ्यासारखा एखादा खासदार इकडून निवडून येऊन तिकडे गेला तर त्याला पब्लिक तर मारेलच पण माझ्या घरात माझे वडील देखील मारतील, बायको नाश्ता देणार नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया सोनवणे यांनी दिली.

मिटकरी हे ऑपरेटर आहेत का ?

अमोल मिटकरी हे कोण आहेत ? हे दादाच्या बंगल्यावर एखादे ऑपरेटर आहेत का ? ते नेमके कोण आहेत ? हे मला माहित नाही, त्यामुळे विचारलं पाहिजे, अमोल मिटकरी हे कोण आहेत. दादाच्या बंगल्यावर कोणाचा फोन आला, त्यांचे रेकॉर्ड कोणाकडे असू शकते तर ते ऑपरेटरकडे, म्हणून मी म्हटलं मिटकरी हे ऑपरेटर आहेत का ? असे सांगत त्यांनी मिटकरी यांना डिवचलं.

कोणावर बोलायचं हे मी ठरवीन!

मी खासदार आहे, मी कोणावर बोलायचं हे मी ठरवीन.कुणाला काय राजकारण करायचे ते करू द्या, शरद पवारांची ताकद देशाने पाहिली आहे. कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचं हे काम आहे, असे सांगत बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी अमोल मिटकरी यांचा समाचार घेत अजित पवार गटाला टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT