Sadabhau Khot: माझं काय चुकलं? म्हणणाऱ्या राजू शेट्टींच्या वर्मावर सदाभाऊंनी ठेवलं बोट; कार्यकर्त्यांना खड्यासारखं बाजूला....

Sadabhau Khot attack on Swabhimani Farmers Association Leader Raju Shetti: राजू शेट्टी यांनी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अपमानस्पद वागणूक दिली. त्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचून बदनाम करायचं कटकारस्थान त्यांनी केलं.
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama
Published on
Updated on

हातकणंगले लोकसभेतील पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मनातून तुटून गेले आहेत."माझं काय चुकलं? प्रामाणिक असणं हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांनो तुम्हीही..." असा भावनिक सवाल शेट्टींनी ( Raju Shetti ) उपस्थित केला आहे. रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्या वर्मावर बोट ठेवलं आहे.

राजू शेट्टी यांना प्रचंड अहंकार आलेला होता. स्वार्थासाठी त्यांनी सर्वच पक्षांचे उबरठे झिजवले. कार्यकर्त्यांना खड्यासारखं बाजूला केले. मात्र जनतेने ते ओळखले आणि जनतेने त्यांना त्यांची दाखवून दिली, अशा शब्दात शेट्टींच्या जिव्हारी लागणारी टीका खोतांनी (Sadabhau Khot) केली आहे.

"राजू शेट्टी यांनी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खड्यासारखं बाजूला केले. त्यांना अपमानस्पद वागणूक दिली. त्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचून बदनाम करायचं कटकारस्थान त्यांनी केलं. त्यामुळे जीवाभावाचे लढणारे कार्यकर्ते त्यांच्यापासून लांब गेले," अशा शब्दात खोतांनी शेट्टींना आरसा दाखवला आहे.

Sadabhau Khot
Rajya Sabha Seat: राष्ट्रवादीत खलबतं; राज्यसभेसाठी भुजबळ की सिद्दीकी? कोणाची लागणार वर्णी

हातकलणंगलेमध्ये शिंदे गट, ठाकरे गट अन् राजू शेट्टी यांच्यात लढत झाली. धैर्यशील मानेंना जनतेनं पुन्हा संधी दिल्यानं शेट्टी नाराज झाले आहेत. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करीत "माझं काय चुकलं? प्रामाणिक असणं हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांनो तुम्हीही..." असा भावनिक सवाल केला होता.

शेट्टी यांच्या या पोस्टवर खोत म्हणाले, "शेट्टी यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत. आंदोलन करत असताना आमची चळवळ प्रस्थापितांच्या विरोधामध्ये उभी केली होती. पण भाजपबरोबर युती असताना स्वतःच्या स्वार्थासाठी ती युती तोडून प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावून ते बसले. निवडणुकीत पराभव दिसायला लागल्यावर मग सगळ्या पक्षांचा उंबरठ त्यांनी झिजवलेले आहेत. ते कबूल करणार नाही. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com