Beed Maha Pashudhan Expo : बीड जिल्ह्यातील परळी इथं महा पशुधन एक्सोपचं भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाला. पंकजा यांचे बंधू तथा अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते.
मुंडे बहीण-भाऊ या एक्सोमध्ये एकत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याचवेळी पशुसंवर्धनला कृषिचा दर्जा मिळाला असल्याचे सांगून, तो प्रस्तावावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कसे योगदान मिळाले, याचे आठवण भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितली.
'ग्रामीण उद्योजकांसाठी, ग्रामीण उद्योजक योजना बनवत आहोत. पशुखात्यामार्फत ही योजना बनवत आहोत. तिला पशुखात्याचं नाव द्याव, अशी मागणी होत आहे. कारण ती योजना पशुखात्याची आहे. महाराष्ट्रात पशुसंवर्धनाला कृषिचा दर्जा द्यावा, हा माझा आग्रह होता. ती कॅबिनेट नोट करून आणली,' अशी माहिती मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिली.
पशुसंवर्धनाला कृषिचा दर्जाचा प्रस्तावाची माहिती देताना, मंत्री मुंडे म्हणाल्या, पशुसंवर्धनाला कृषिचा दर्जा घेताना, त्याची नोट कॅबिनेटमधून घेताना, अजितदादांसमोर (Ajit Pawar) हा प्रस्ताव गेला. बैठक सुरू होती. मंत्री हसन मुश्रीफ हे देखील होते. त्यांच्या मतदारसंघात, पशुधन खात्याची त्यांना जमीन लागत होती. त्यावेळी दादांना म्हटले होती की, 'दादा मी जमीन देते, पण या प्रस्तावावर सही करा', अशी अट घातली.
'यावर दादा हसत होते, न् ताई बरोबर काम करू घेत आहेत, असा त्यांचे भाव होता. त्यावर, हे काम सर्वसामान्यांचे काम आहे,' असे आपण सांगितल्याची आठवण मंत्री मुंडे यांनी दिली. या प्रस्तावाचं त्यांनी खूप कौतुक केलं. तसंच मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रस्तावावर कौतुकाची छाप उमटली.
केंद्र सरकारने देखील त्यांच्या परिसंवादात देखील कौतुक केलं. देशातील महाराष्ट्र राज्य पहिलं आहे की, त्यानं पशुसंवर्धनाला कृषिचा दर्जा दिला. याचा फायदा पशुपालकांना होणार आहे. कृषिवर जसा व्याजाचा दर आहे, तसा तो पशुपालकांना मिळणार आहे. वीज सवलतीचा फायदा मिळणार आहे. कृषि शेतकऱ्याला जसा प्रत्येक लाभ मिळतो, तसा तो मिळणार आहे, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.
बीडच्या परळी इथल्या, महा पशुधन एक्सपोमध्ये, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी एकाच गाडीतून प्रदर्शनाची पाहणी केली. या प्रदर्शनात देशभरातील वेगवेगळ्या प्राण्यांच्या ब्रीड्स व त्यांच्या विषयीची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबरोबरच दुग्ध विकासासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील केले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.