Hardcore Hindu : राणेंची गर्जना, ‘कट्टर हिंदू, तडजोड नाही!’ विरोधकांना उघडं आव्हान

Nitesh Rane Says ‘Hardcore Hindu First’ at Bajrang Dal Event Sindhudurg BJP Minister Statement : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी आमदार आणि पालकमंत्री अगोदर कट्टर हिंदू असल्याचे विधान केले.
Nitesh Rane Bajrang Dal program
Nitesh Rane Bajrang Dal programSarkarnama
Published on
Updated on

Nitesh Rane Bajrang Dal program : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होताच, भाजप मंत्री नीतेश राणे यांनी पुन्हा हिंदुत्वाचा हुंकार भरला आहे.

'मंत्री, आमदार असलो, तरी त्याअगोदर मी एक कट्टर हिंदू आहे', असे विधान करत, विरोधकांना एकप्रकारे आव्हान दिलं आहे. तसंच हिंदू समाजाला बळकट करणे आणि त्याीच सुरक्षा करणे हे माझे परम कर्तव्य आहे, असेही मंत्री राणे यांनी म्हटले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रेत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने हिंदू (Hindu) धर्मावर होणारी विविध आक्रमणे, लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरणसारख्या गंभीर विषयांवर जनजागृतीसाठी रील्स स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंत्री राणे यांच्या उपस्थित पार पडला.

मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, "मी जिल्ह्याचा आमदार अन् पालकमंत्री असलो, तरी त्याही आधी मी एक कट्टर हिंदू आहे आणि तुमच्या सोबत सदैव उभा आहे. हिंदू समाजाला बळकट करणे आणि त्याची सुरक्षा करणे हे माझे परम कर्तव्य आहे. ही रील्स स्पर्धेतून हिंदू राष्ट्राला भक्कम करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे."

Nitesh Rane Bajrang Dal program
Manoj Naravane book controversy : ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’नंतर मोदी सरकार अलर्ट मोडमध्ये; अधिकाऱ्यांच्या लेखन स्वातंत्र्यावर गंडांतर

विश्व हिंदू परिषदेचे प्रदेश मंत्री मोहन साळेकर यांनी, हिंदू मुलींवर लव्ह जिहादच्या शिकार होत आहे. पण दुसऱ्यावर आलेलं संकट आहे, मला काय त्याचे? ही वृत्ती घातक आहे. इथल्या जत्रेतही 25-30 टक्के स्टॉल विविध धर्मियांचे आहेत. ज्यांची आमच्या देवावर श्रद्धा नाही, ते पूजेचे सामान कसे विकू शकतात? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कोकणात मिनी पाकिस्तान आणि मिनी ख्रिस्तीस्थान उभे राहत आहे, असे म्हणत त्यांनी जात-पात विसरून केवळ हिंदू म्हणून एकत्र येण्याचे आवाहन केले.

Nitesh Rane Bajrang Dal program
HSC Board Exam 2026: बारावीच्या परीक्षा; 'कॉपी'मुळे दादा भुसे संतापले, परिक्षाकेंद्रांसह पालकांनाही धडा शिकवण्याची तयारी!

‘ही तर केवळ झाँकी आहे, अभी बहुत कुछ बाकी आहे‌’ असा निर्धार करत आंगणेवाडीच्या पवित्र भूमीतून सुरू झालेला हा जागर भविष्यात अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. जिल्हा मंत्री आनंद प्रभू, जिल्हा बजरंगदल संयोजक कृष्णा धुरपंवर, कोकण विभाग संयोजक दत्तप्रसाद ठाकूर, मालवण बजरंग दल प्रखंड गणेश चव्हाण, विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री अमोल गावडे, विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन लारा मयेकर यांनी केले.‌

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com