Beed police headquarter Suicided incident  Sarkarnama
मराठवाडा

बीडमध्ये प्रजासत्ताक दिनाला गालबोट; धनंजय मुंडेंसमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Beed Police headquarter Suicided incident : रस्त्याच्या गैरकारभारची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी

सरकारनामा ब्युरो

बीड : संपूर्ण देशासह आज राज्यात ७३ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत साजरा होत आहे. मात्र एका घटनेने बीडमधील प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले आहे. इथे एकाने पोलीस मुख्यालय मैदानावर (Police Headquarters) झेंडावंदनस्थळीच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासमोर आत्मदहन (Self-immolation) करण्याचा प्रयत्न केला आहे. विनोद शेळके असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी झेंडावंदन पार पडल्यानंतर विनोद शेळके यांनी झेंडावंदन स्थळी झेंड्याच्या समोरचं अंगावर डिझेल (Diesel) ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे अचानक झेंडावंदन स्थळी खळबळ उडाली. पोलिसांनी धाव घेत त्यांच्या हातालील साहित्य काढून घेण्याचा प्रयत्न केला.

बीड (Beed ) शहरातील पंचशील नगर रस्त्याचे बोगस काम झाल्याची तक्रार करून देखील कारवाई (Action) झाली नाही. त्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे शेळके यांच्याकडून समजते आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर अन् आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान या घटनेची मंत्री मुंडे यांनी गंभीर दखल घेतली असून ते म्हणाले की, कोणताही रस्ता (road) एका व्यक्तीसाठी नसतो, त्यांनी चौकशीचे पत्र दिले असते तरी चौकशी (Inquiry) केली असती. त्या रस्त्याची आम्ही चौकशी करू. विशेष म्हणजे ट्राय पार्टीकडून देखील चौकशी करू, असे आश्वासनही मुंडे यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT