मोदी सरकारचे 'इलेक्शन कार्ड'? कल्याण सिंह यांच्यासह युपीत सर्वाधिक पद्म पुरस्कार

Padma Awards 2022 : महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : काल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२२ च्या पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2022) घोषणा करण्यात आली. यात यावर्षी देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला 'पद्मविभूषण' पुरस्कार ४ जणांना जाहीर झाला आहे. तर पद्मभूषण पुरस्कार १७ जणांना जाहीर झाला आहे. याच सोबत पद्मश्री हा पुरस्कार १०७ जणांना जाहीर झाला आहे. या पुरस्कार प्राप्त सन्मानार्थ्यांची राज्यनिहाय यादी बघितल्यास सर्वाधिक यात १३ नावं ही उत्तर प्रदेशमधील आहेत. त्यानंतर १० नावांसह महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर आहे.

उत्तर प्रदेशसह देशात सध्या ५ राज्यांमध्ये निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्याचसोबत सर्वाधिक पुरस्कार देखील उत्तर प्रदेशमध्येच देण्यात आले आहेत. यामुळे मोदी सरकारने उत्तरप्रदेश निवडणूकांच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर 'इलेक्शन कार्ड' खेळले आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. गतवर्षी तमिळनाडू निवडणुकांच्या आधी तमिळनाडूमधीलच जेष्ठ अभिनेते रजनीकांत (Rajnikant) यांना दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा देखील असाचं सवाल विचारला गेला होता.

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री दोन तासातच नाकारला पद्मभूषण पुरस्कार

हे आहेत उत्तर प्रदेशमधील मानकरी :

उत्तरप्रदेशमध्ये गोरखपुर गीता प्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या राधेश्याम खेमका (radeshyam khemka) यांचा साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात तर दिवंगत माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह (Kalyan singh) यांना 'सार्वजनिक सेवा' या क्षेत्रात मरणोत्तर 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय राशिद खान (कला), वशिष्ठ त्रिपाठी (साहित्य आणि शिक्षण) यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

तर कमालिनी अस्थाना आणि नलिनी अस्थाना (कला), शिवनाथ मिश्रा (कला), शिशराम (कला), विद्या विंदू सिंह (साहित्य आणि शिक्षण), शिवानंद (योग), अजय कुमार सोनकर (विज्ञान आणि अभियांत्रिकी), अजिता श्रीवास्तव (कला), डॉ. कमलकार त्रिपाठी (संशोधन) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
पद्म पुरस्कारासाठी अधिकाऱ्यांचा फोन आला अन् थेट दिला नकार!

इतर राज्यांमध्ये कोणाला किती पद्म पुरस्कार?

इतर राज्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास महाराष्ट्र-१०, गुजरात-७, तामिळनाडू-७, पश्चिम बंगाल-७, ओडिसा-६, दिल्ली-५, मध्य प्रदेश-५, हरियाणा-५, कर्नाटक-५, राजस्थान-५, उत्तराखंड-४, केरल-४, पंजाब-४, तेलंगाना-४, आंध्र प्रदेश-३, मणिपुर-३, गोवा-२, आसाम-२, बिहार-२, हिमाचल प्रदेश-२ झारखंड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिजोरम, नागालैंड, सिक्किम या राज्यांमधील प्रत्येकी एका व्यक्तीला पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com