Beed crime news : मस्साजोग इथले संतोष देशमुख यांची निर्घृण हत्येनंतर बीडची गुन्हेगारी देशभरात चर्चेत आली. यानिमित्ताने अनेकांकडे असलेल्या शस्त्र परवान्यानेही भुवया उंचवल्या होत्या. त्यातून हवेत फैरी झाडणे, पिस्तुलीबरोबर स्टायलिश रिल्स काढणे, गुन्हेगारांचा शस्त्र घेऊन वावर, या सर्वांविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचा संतापाची लाट उसळली. यावरून खडबडून जागं झालेल्या जिल्हा महसूल प्रशासन आणि पोलिस विभागानं वर्षभरात 365 शस्त्र परवाने रद्द केले. यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 96 जणांचा समावेश आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या झाली. यानंतर बीड (BEED) जिल्ह्यातील वाळू अन् राखेची माफियागिरी, अग्नि शस्त्रांचा वापर, यातूनच कायदा अन् सुव्यवस्थेचे अनेक मुद्दे समोर आले. बीड जिल्ह्यात जानेवारी 2025 मध्ये महिन्यात तब्बल 1 हजार 281 शस्त्र परवाने होते.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडकडेही शस्त्र परवाना होता. दरम्यान, काही परवानाधारकांचे हवेत फैरी झाडताना, हातात पिस्तूल घेऊन फोटोसेशन करतानाचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे वर्षाच्या सुरवातीला गुन्हेही (Crime) नोंद झाले. दरम्यान, 49 परवानाधारकांनी स्वत:हून परवाने समर्पित केले.
महसूल विभागाने गृह विभागाकडून अहवाल घेतल्यानंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी काही परवान्यांचे नूतनीकरण करण्यास हरकत घेतली. तसेच गुन्हा नोंद असलेल्यांची यादीही महसूल विभागाला सोपविण्यात आली. यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक व जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तब्बल 365 परवाने रद्द केले. सध्या जिल्ह्यात 916 लोकांकडे शस्त्र परवाने आहेत.
बीड जिल्ह्यात गंभीर गुन्हे नोंद असलेल्यांकडेही शस्त्र परवाने हेाते. महसूल विभागाने गुन्हे नोंद असलेल्यांचा अहवाल मागविला. त्यावर गृह विभागाने यातील 96 लोकांवर गुन्हे नोंद असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे त्यांचेही परवाने रद्द करण्यात आले. परवाने असलेल्यांमध्ये 100 मृत आणि 70 वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश होता. त्यांचेही परवाने रद्द करण्यात आले. दरम्यान, या वर्षभरात नव्याने केवळ चार शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. यात तीन परवाने बँकांचे आहे. रोकड वाहतूक करण्यासाठी सुरक्षितता म्हणून हे परवाने देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.