Aryan Khan controversy : शाहरुख खान पुत्राचे आक्षेपार्ह हावभाव; पोलिसाकडून चौकशी सुरू, सीसीटीव्ही फुटेज जप्त

Complaint Filed Against Aryan Khan for Offensive Gesture at Bengaluru Event : सार्वजनिक कार्यक्रमात आक्षेपार्ह हावभाव केल्याच्या आरोपावरून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानविरुद्ध वकिलाने पोलिसात तक्रार दाखल.
Aryan Khan controversy
Aryan Khan controversySarkarnama
Published on
Updated on

Aryan Khan Bengaluru event gesture : गेल्या 28 नोव्हेंबरला इथल्या एका पबमध्ये झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमात आक्षेपार्ह हावभाव केल्याच्या आरोपावरून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानविरुद्ध वकिलाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

सांके रोड इथल्या रहिवासी आणि वकील ओवैज हुसेन एस. यांनी डीजी अ‍ॅण्ड आयजीपी, बंगळूर शहर पोलिस आयुक्त, डीसीपी (मध्य विभाग), क्युबन पार्क पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि कर्नाटक राज्य महिला आयोगाकडे ही तक्रार दाखल झाली आहे.

तक्रारदाराने आरोप केला आहे की, कार्यक्रमस्थळी अनेक महिलांच्या (Women) उपस्थितीत आर्यन खान याने आक्षेपार्ह हावभाव केले. ज्यामुळे त्यांच्या विनयशीलतेचा अपमान झाला. तसेच या कृत्यामुळे ‘सार्वजनिक अस्वस्थता, लाज आणि भावनिक त्रास’ निर्माण झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीत तीन गुन्ह्यांचा (Crime) उल्लेख करण्यात आला आहे. महिलेच्या विनयशीलतेचा अपमान, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये, सार्वजनिक गोंधळ किंवा चिंता निर्माण करणारी वर्तणूक अशा तीन कायद्यांचे उल्लंघन झाले आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ तक्रारदाराने फेब्रुवारी 2025 मधील चामराजपेट येथील प्रकरणाचा उल्लेख केला आहे, ज्यात एका व्यक्तीला महिलेकडे मधले बोट दाखवल्याप्रकरणी अटक केली होती.

Aryan Khan controversy
Devendra Fadnavis Warning : 'फडणवीसांच्या इशाऱ्यावर इतर पक्ष चालतात', शिंदेंच्या आमदाराने फोडला बॉम्ब! 2022 चा इतिहास सांगत भाजपला दिला थेट इशारा!

आर्यन खानच्या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अशोकनगर पोलिस ठाणा हद्दीत झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित काही लोकांनी खान याने प्रेक्षकांकडे मधले बोट दाखवल्याचा दावा केला आहे.

Aryan Khan controversy
PM Modi gift to Vladimir Putin : पीएम मोदींनी पुतिन यांना दिली पवित्र श्रीमद्भगवद्गीता भेट; रशियन राष्ट्राध्यक्षांची आली प्रतिक्रिया...

दरम्यान, पोलिस उपायुक्त (मध्य विभाग) मच्छिंद्र यांनी सांगितले की, सोशल मीडिया पोस्टच्याआधारे स्वतःहून चौकशी सुरू केली आहे. पब परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले गेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com