Walmik Karad Santosh Deshmukh Murder sarkarama
मराठवाडा

Santosh Deshmukh Case : बीड हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडसह 'या' आरोपींची कोठडी आज संपणार, पुढे काय?

Accused Valmik Karad in Santosh Deshmukh case : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बीडमधील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील 6 आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी (ता.18) संपणार आहे. ही मुदत संपल्यानंतर आता त्यांच्यावर पुढील कारवाई काय होणार याचा निर्णय आज होणार आहे.

Jagdish Patil

Beed News, 18 Jan : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बीडमधील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) sयांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील 6 आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी (ता.18) संपणार आहे. ही मुदत संपल्यानंतर आता त्यांच्यावर पुढील कारवाई काय होणार आणि कोणती कोठडी सुनावली जाणार का? याबाबतचा निर्णय आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे.

मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होण्याची शक्यता आहे. कारण या खून आणि अपहरण प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) याला न्यायालयातून घेऊन जात असताना त्याच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली होती. शिवाय यावेळी संतोष देशमुख यांचे समर्थक आणि कराडचे समर्थक आमनेसामने आले होते.

त्यामुळे सुनावणीवेळी न्यायालय परिसरात पुन्हा काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी ही सुनावणी ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्यामुळे त्यांना आज बीडच्या (Beed) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.

यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे. तर देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे. या आरोपींपैकी सुधीर सांगळे, सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे हे माजलगाव येथील पोलिस कोठडीत आहेत. तर जयराम चाटे, प्रतीक घुले व महेश केदार हे गेवराई पोलिस कोठडीत आहेत.

या दोन्ही पोलिस कोठडीतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या आरोपींना सुनावणीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मस्साजोग येथील आवादा कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी, 14 जानेवारीच्या सुनावणीत, केज न्यायालयाने कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र यानंतर लगेच कराडच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे याप्रकरणी एसआयटीने न्यायालयाला कराडला जामीन देऊ नये अशी विंनती केली आहे. त्याला जामीन मिळाला तर तो या प्रकरणाशी संबंधित पुरावे नष्ट करू शकतो, असा युक्तीवाद एसआयटीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता आजच्या सुनावणीत न्यायलय नेमका काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT