Beed Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याप्रकरणात सीआयडीने विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यात या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे म्हटले आहे.
यावरून पुन्हा बीडमधील राजकीय गुन्हेगारीवर विरोधकांनी हल्ला चढवला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला चढवला.
भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सत्ता, पालकमंत्री, पैसा, मस्ती अन् दहशत, यातूनच वाल्मिक कराडचा मास्टरमाईंड तयार झाला. वाल्मिक कराड हा मास्टरमाईंड आहे, तर विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे त्याचे प्यादे असल्याचे आमदार धस यांनी म्हटले.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात आमदार सुरेश धस म्हणाले, "अजित पवारांनी (Ajit Pawar) राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडे यांच्या पारड्यात टाकला आहे. ज्यावेळेस अजित पवारांना राजीनामा देण्याची वेळ आली, त्यावेळेस त्यांनी स्वतः निर्णय घेतला होता. आता हे धनंजय मुंडे यांनी समजून घेतले पाहिजे".
'अजित पवार यांना माहिती देणारे लोक चुकीच्या पद्धतीने गाईडलाईन्स करत आहेत, म्हणून त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाला मोठी हानी होणार आहे', असा दावा देखील आमदार धस यांनी म्हटले.
'वाल्मिक कराड हा साधासुधा आरोपी नाही, त्याची परळीमध्ये मोठी दहशत केली. परळीमधील अनेक लोकांना त्रास देण्याचे काम आरोपी वाल्मिकने केले आहे. वाल्मिक कराड याला पूर्णपणे धनंजय मुंडे यांची मुखसंमती होती. यांचे पालकमंत्रिपद काही काळासाठी वाल्मिक कराड याच्याकडे भाड्याने होते', असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला.
'मंत्री धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रिपद, कृषीमंत्रिपदाच्या काळात पैसा आला, पैसामधून मस्ती आली अन् हे उद्योग वाल्मिक कराड आणि त्याच्यासारख्यांना सुचले. आतापर्यंत यांच्या सर्व घटनेतील संतोष देशमुख यांची हत्येच्या क्रूरतेचा कळस ठरली, यातूनच त्यांचा घडा भरला', असा घणाघात देखील आमदार सुरेश धस यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.