Kiran Lahamate vs Radhakrishna Vikhe : 'अकोल्याचे पाणी लय खतरनाक हाय'; अजितदादांच्या आमदाराचा भाजप मंत्र्यांला इशारा

NCP MLA Kiran Lahamate BJP Minister Radhakrishna Vikhe Pimpalgaonkhand Dam Akole : अकोले इथल्या पिंपळगावखांड धरणातील आवर्तन बंद करत एनसीपी आमदार किरण लहामटे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना इशारा दिला.
Kiran Lahamate
Kiran LahamateSarkarnama
Published on
Updated on

NCP MLA Kiran Lahamate : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोले मतदारसंघातील आमदार किरण लहामटे यांनी पिंपळगावखांड धरणातून शेती सोडण्यात आलेले आवर्तन थांबवत भाजप पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर निशाणा साधला.

"आमच्यावर अन्याय करणार असेल, तर जमणार नाही. अकोल्याचे पाणी लय खतरनाक आहे. अकोले काय आहे हे अजून बऱ्याच जणांना माहीत नाही", असा टोला आमदार लहामटे यांनी पालकमंत्री विखे यांचे नाव न घेता लगावला.

मुळा नदीवरील सहाशे दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पिंपळगावखांड लघुपाटबंधारे तलावातून 20 फेब्रुवारीपासन आर्वतन सुरू आहे. लाभक्षेत्रातील आभाळवाडीपर्यंत पाणी पोचल्यानंतर आवर्तन बंद करावी अशी स्थानिक शेतकऱ्यांची (Farmer) मागणी होती. लाभक्षेत्राबाहेर पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा टोकाचा विरोध आहे. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचल्यानंतरही आवर्तन सुरू होते.

Kiran Lahamate
Top Ten News : घड्याळ अजितदादांचे की शरद पवारांचे? वसंत मोरेंना सवाल, बीडमध्ये ड्युटी नको रे बाबा -वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

शेतकऱ्यांनी आवर्तन बंद केले. परंतु अधिकाऱ्यांनी पुन्हा सुरू केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार किरण लहामटे यांनी शेतकऱ्यांसह धरणस्थळी जात चाक बंद करीत पाणी सोडणे थांबवले. आवर्तन पुन्हा सुरू होऊ नये यासाठी आमदार लहामटे यांनी 'चाक बंद' आंदोलन केले. आमदार लहामटे यांनी या पाणी मुद्यावरून भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर निशाणा साधला.

Kiran Lahamate
Santosh Deshmukh Murder Case : बीडमध्ये ड्युटी, 'नको रे बाबा'; पोलिस अधिकाऱ्यांची आता बदलीसाठी 'फिल्डिंग'

आमदार किरण लहामटे म्हणाले, "कुणीही यावं आमच्यावर अन्याय करावा, ही हुकूमशाही अकोल्यात चालवून घेतली जाणार नाही. सर्व धरण अकोले तालु्क्यात आहेत. नद्या इथंच उगम पावतात. भरमसाठ पाऊस पडतो, असे असताना आमच्यावरच अन्याय करणार असेल, तर जमणार नाही".

हुकूमशाही मोडणारच...

'अकोल्याचे पाणी खरतनाक आहे. अकोले काय आहे, हे अजून बऱ्याच जणांना माहीत नाही. अकोल्यात हुकूमशाही चालवून घेणार नाही. आपण राजकारणात आलो आहे, ती हुकूमशाही मोडण्यासाठी. 2019 मध्ये लोकांनी निवडून दिले, ते हुकूमशाही मोडण्यासाठीच! तालुक्याच्या हक्काचे पाणी खाली नेल्यास स्थानिक शेतकऱ्यांनी करायचे काय? आपण शेतकऱ्यांसाठी लढतो आहे. येथून कोणी हलवल्यास किंवा पाणी सोडण्याचा पुन्हा प्रयत्न केल्यास अन्नत्याग आंदोलन करू', असा इशारा आमदार किरण लमहामटे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com