Beed political news : संतोष देशमुख हत्येत, प्रमुख सूत्रधार वाल्मिक कराड तुरुंगात असलेला, तरी त्याची बीडमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस क्रेझ असल्याचे कायम दिसते. यातून वाल्मिक कराड आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधावर जोरदार चर्चा होतात.
वाल्मिक कराड याला यातूनच काहीही होणार नसल्याची चर्चा सुरू आहेत. मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी वाल्मिक कराड याचा फोटो बॅनर वापरत असल्याचे पुरावे अजित पवार यांना दिले आहेत. अजित पवार यावर आता काय आदेश देतात, याकडे लक्ष लागले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येतील संशयित प्रमुख सूत्रधार वाल्मिक कराड याची दहशत काही कमी झालेली नाही. बीडमधील राजकीय गुन्हेगारीचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला झाल्यानंतर देखील, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाल्मिक कराड याची क्रेझ कमी झालेले दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बॅनरबाजीवर वाल्मिक कराड याचा फोटो अजूनही कायम दिसतो.
बीड (BEED) जिल्हा कारागृहातून वाल्मिक कराड याचा एका व्यक्तीला फोन झाल्याचा अंबादास दानवे यांनी खळबळजनक दावा केला होता. त्यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना दानवे काही बोलले असतील, तर त्यांच्याकडे पुरावे असतील. 'शंभर टक्के, असं काही कोणी खोटं बोलण्याचा विषय येत नाही. फोन झाला असेल आणि तो छोटा फोन नेमकी कोणाचा आहे, किती कॉल झाले, त्याची डिटेल्स आणि त्याच्या संपूर्ण तपासणी गरजेचे आहे', असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.
'कारागृह प्रशासनाने याची चौकशी करावी. तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तरी त्या फोनवरून कोण बोलत होते, बाहेर कोण सूचना देत होते आणि आता जे जेलच्या बाहेर चाललो आहे, जे काही सूत्र हालत आहेत, जे काही आरोपींचे बॅनर लावत आहेत, ते अजित पवारांचे पदाधिकारी आहेत', असा घणाघात धनंजय देशमुख यांनी केला.
'आम्ही अजित पवारांकडे बॅनर लावणाऱ्यांचे पुराव्यानिशी माहिती दिली आहे. तसेच फोनची संपूर्ण सखोल चौकशी होऊन आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे', अशी मागणी देखील केल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.