Mumbai News : बीड जिल्ह्यातील ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारांना पाठिंबा दिल्याने, बदनामी होत असल्याचा पुनरूच्चार भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर आमदार धस यांनी जोरदार भाषण केले.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचा उल्लेख करताना, त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेचे आमदार धस यांनी स्वागत केले.
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील खुंटेफळ सिंचन प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्हा दौऱ्यावर होते. आष्टी तालुक्यात झालेल्या या कार्यक्रमात भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर जोरदार भाषण केले.
आमदार सुरेश धस म्हणाले, "काही लोक सांगतात, बीड (BEED) जिल्ह्याची बदनामी होते.पण साहेब, क्रांतीसिंह नाना पाटील, रख्माजी पाटील, केसरकाकू क्षीरसागर, बबनराव ढाकणे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंसाहेबांसारखे नेते या जिल्ह्याने देशाला दिल आहेत. प्रशासकीय अधिकारी राजेश कुमार, आनंद लिमये, सुनील केंद्रेकर, नवलकिशोर राम, संतोष रस्तोगी, लखमी गौतमी या अधिकाऱ्यांनी आपल्या कामाचा ठसा या जिल्ह्यात उमटवला आहे".
'पण ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारीला पाठिंबा दिल्याने जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली आहे. साहेब, संतोष देशमुख प्रकरणात आपण कणखर भूमिका घेतली. ती कणखर भूमिका सर्व बीड जिल्ह्याला आवडली. तुम्ही ते म्हणाले होते, मी कोणालाच सोडणार नाही, त्यावर सगळ्या जनतेचा विश्वास आहे. मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू यांना सुद्धा आहे. त्यात मकोका लागला पाहिजे, तशी ही विनंती आहे', असेही सुरेश धस यांनी म्हटले.
'2014 मध्ये माझा पराभव झाला. आता 202 आहे. या कालावधीत खुंटेफळ तलावाचे फक्त दोन टक्के काम झालं. मी आता निवडून आल्यानंतर आता 23 टक्के काम झालं. तत्कालीन जलसंपदा असताना मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच रखडलेल्या कामांना एका दिवसात परवानगी दिली होती. आतापर्यंत 40 टक्के काम झाले. बोगदाचा आता शुभारंभ झाला आहे. आपण 300 कोटी दिले. त्याबद्दल आभार मनतो', असेही सुरेश धस यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.