NCP Politics : अजितदादांच्या पक्षात राहून विरोधी कारवाया, महिला जिल्हाध्यक्षांचं निलंबन; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

DCM Ajit Pawar NCP Party Anuja Salve Buldhana District President : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निष्क्रिय असण्याबरोबर पक्षविरोधी कारवायांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील महिला जिल्हाध्यक्षांवर कारवाई.
NCP Politics 1
NCP Politics 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून महिला जिल्हाध्यक्षाचे निलंबन झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनुजा साळवे यांच्यावर ही कारवाई झाली आहे.

महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, अनुजा साळवे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांवर जातीवादाचा, अपमानाची वागणुकीचा आरोप करत 15 डिसेंबर 2024 मध्ये राजीनामा पाठवला असल्याचा दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी, प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील आणि मनोज कायंदे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र देत, महिला जिल्हाध्यक्ष पक्ष संघटनेबाबत निष्क्रिय असल्याची तक्रार केली होती. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद नसून, फक्त समाज माध्यमांवर सक्रिय आहेत, असेही तक्रारीत म्हटले होते.

NCP Politics 1
BJP Politics : खडसे-फडणवीस भेट; प्रवेशाचा मुहूर्त ठरला? काय राजकारण शिजलं, नक्की काय ठरलं?

विधानसभा निवडणुकीत (Election) सिंदखेडराजा मतदारसंघातील उमदेवार मनोज कायंदे यांच्याविरोधात काम केले. प्रचारात सक्रिय नव्हत्या. अजितदादांची सभा होती, त्यावेळी हजेरी लावली. सभा रद्द होताच, सभास्थळ सोडले. छगन भुजबळ यांची सभा झाली. त्यावेळी त्या उपस्थित नव्हत्या. संघटन नसल्याने त्या एकट्या असतात, अशी तक्रार केली होती.

NCP Politics 1
Top 10 News : खडसे-फडणवीस भेट; प्रवेशाचा मुहूर्त ठरला? 'हा' अधिकारी सरकारच्या 'टार्गेट'वर, एकाच महिन्यात तीनवेळा बदली - वाचा महत्त्वाच्या हेडलाईन्स

साळवे यांची चाकणकरांकडून निंलबन

महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या तक्रारीची दखल घेत अनुजा साळवे यांनी पक्षातील पदावरून निलंबित केले आहे. दरम्यान अनुजा साळवे यांनी नाझारी काझी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तसेच आपण पक्षाचा राजीनामा त्यांच्या तक्रारीपूर्वीच पाठवला असल्याचा दावा केला.

नाझीर काझींवर आरोप

अनुज साळवे यांनी रुपाली चाकणकर यांना पत्र देताना, नाझीर काझी यांच्याकडून पक्षात सतत अपमानाची वागणूक मिळाली. पक्षात गेली चार वर्षांपासून निष्ठेने सक्रिय असून प्रामाणिकपणे काम केले. माझ्या निष्ठेविषयी सतत चुकीची माहिती पसरवली गेली. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून पक्ष संघटना टिकणार नाही. जातीयवाद फोफावला, तर सामान्यांना न्याय मिळणार नाही. मराठा समाजातील सक्षम महिलेला अशापद्धतीने राजीनामा द्यावा लागत आहे, हे निराशाजनक आहे, असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com