Ujjwal Nikam sarkarnama
मराठवाडा

Beed Santosh Deshmukh Murder : फरार असताना कृष्णा आंधळेचा विष्णू चाटे अन् वाल्मिक कराडला तीनवेळा फोन; उज्ज्वल निकमांनी खटल्यावरची 'पक्कड' दाखवली

Special Public Prosecutor Ujjwal Nikam Krishna Andhale Vishnu Chate Walmik Karad Santosh Deshmukh murder case Beed : बीड संतोष देशमुख हत्येत वाँटेड असलेला कृष्णा आंधळे विष्णू चाटे अन् वाल्मिक कराड याच्या संपर्कात असल्याचा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा दावा.

Pradeep Pendhare

Maharashtra Crime News : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याची पहिली सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीनं न्यायालयात बाजू मांडली. पहिल्याच सुनावणीत खटल्यावर आपली किती पक्कड मजबूत आहे, याची झलक दाखवली.

कृष्णा आंधळे फरार असताना, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड याच्या संपर्कात होता. त्याच्यांत तीनवेळा फोन झाला. सीडीआरमधून तशी माहिती समोर येते, याकडे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

भाजपचे (BJP) बूथ प्रमुख तथा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाच्या खटला बीड मकोका न्यायालयात सुरू झाला आहे. या खटल्याच्या पहिल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दोषनिश्चितीची मागणी करताना, खटल्यातील महत्त्वाच्या पुराव्याकडे लक्ष वेधले.

हत्येतील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकांकडे लक्ष वेधले. या बैठका 28 आणि 29 नोव्हेंबरला बैठका झाल्या. दोषारोपपत्रात या सर्व गोष्टी मांडल्या आहेत. मात्र एक गोष्ट दोषारोपपत्रामध्ये नाही. ती म्हणजे सीडीआर, हाच मुद्दा उज्ज्वल निकम यांनी पकडत, न्यायालयात (Court) युक्तिवाद केला.

सीडीआरचा मुद्दा, दोषारोपपत्रापेक्षा वेगळा आहे. यात कृष्णा आंधळे फरार असताना विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड याला तीनवेळा फोन केला होता. सीडीआरमधून ही माहिती समोर येत असून, हाच महत्त्वाचा पुरावा आहे, हेच वाल्मिक कराड याचे संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी असलेले थेट कनेक्शन आहे. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात उपस्थित केलेल्या या मुद्यांवरून वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढल्या आहेत.

उज्ज्वल निकम यांनी खटल्यात दोषारोपपत्र निश्चितीसाठी तयार असल्याचे सांगितले. वाल्मिक कराड याच्या वकिलांनी त्याला विरोध केला. दोषारोपपत्रामधील गोपनीय जबाब आणि कागदपत्र अजून मिळाली नाहीत, याच कागदपत्रांची मागणी आरोपींच्या वकिलांनी पुन्हा न्यायालयात सांगितले.

हत्येच्या घटनेशी निगडीत सरकारने केलेल्या तपासाची माहिती मिळणे, हा आमचा अधिकार आहे. सरकारी वकिलांनी घटनेचा संदर्भ सांगताना सीडीआर आणि मोबाईल टॉवर लोकेशनची माहिती दिली आहे. त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. ती अगोदर आम्हाला मिळावी यानंतरच, दोषरोपपत्र निश्चित करावे, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT