Beed Mahavitaran crime News Sarkarnama
मराठवाडा

Beed News : पवार, खाटोकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

In the Beed sexual assault case, accused individuals Pawar and Khatokar have been remanded to judicial custody. : याप्रकरणी पोलिसांनी 30 जणांचे जबाब नोंदवले असून पीडितेच्या मैत्रिणी, कुटुंबीय, क्लासमधील काही जणांचा यात समावेश आहे.

Jagdish Pansare

Marathwada News : बीड लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस कोठडी संपल्यामुळे या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या दोघांना यापूर्वी दोन दिवसांची आणि त्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

बीड (Beed News) येथील खासगी कोचिंग क्लासेसमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर पवार, खाटोकर यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार काही दिवसापुर्वी उघडकीस आला. या प्रकाराने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला होता. पिडित मुलीने पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. दरम्यान, विधीमंडळ अधिवेशनात या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आयपीएस महिला अधिकार्‍याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्याची घोषणा सभागृहात केली होती. पोलीसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असताना पोलीसांनी आरोपींना तीन दिवसांचाच पीसीआर कसा मागितला? असा सवाल करत पोलीसांच्या तपासावर संशय व्यक्त केला होता. दरम्यान, पवार, खाटोकर या दोघांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी 30 जणांचे जबाब नोंदवले असून पीडितेच्या मैत्रिणी, कुटुंबीय, क्लासमधील काही जणांचा यात समावेश आहे. पोलिसांनी खाटोकरची दुचाकी जप्त केली असून दोघांचे मोबाइल, टॅब, लॅपटॉपही जप्त केले आहेत. तर क्लासमध्ये 40 सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यांचे डीव्हीआर जप्त केले आहेत. पोलिसांनी या घटनेतील लॅपटॉप, मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवले आहेत.

पाच महिन्यात 78 गुन्हे

बीडमध्ये प्रत्येक दोन दिवसांनी एक बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याची नोंद होत आहे. जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराचे 78 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. यातील 42 गुन्हे अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराचे तर 36 गुन्हे विनयभंगाचे आहेत. पाच महिन्यांत एकूण बलात्काराच्या घटनांमध्ये 49 टक्के पीडिता अल्पवयीन असल्याची बाब यातून समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT