Beed sexual harassment : बीड कोचिंग क्लास लैंगिक छळ प्रकरणी मोठी अपडेट! पीडितीने बालकल्याण समितीसमोर सांगितले नराधम शिक्षकाचे विकृत चाळे

Beed sexual harassment case : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे चर्चेत आलेला बीड जिल्हा आता पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. या प्रकरणावरून बीडसह राज्यातील राजकारण तापलं आहे.
Beed sexual harassment case
Beed sexual harassment caseSarkarnama
Published on
Updated on

Beed sexual harassment case : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे चर्चेत आलेला बीड जिल्हा आता पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. या प्रकरणावरून बीडसह राज्यातील राजकारण तापलं आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी या प्रकरणावरून शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे बीडमधील (Beed) राजकारण ढवळून निघालं असतानाच आता या प्रकरणी आणखी एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे.

Beed sexual harassment case
Krishnarao Bhegade Passes Away : मावळचे शिक्षणमहर्षी हरपले! माजी आमदार कृष्णराव भेगडे काळाच्या पडद्याआड

ती म्हणजे या प्रकरणातील पीडित मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी या पीडितेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. जो ऐकून या तिच्या आई-वडिलांच्या अश्रुचा बांध फुटला.

पीडित मुलीने बालकल्याण समिती समोर सांगितलं की, शिक्षक प्रशांत खाटोकर तिला सतत बॅडटच करायचा. त्याने केबिनमध्ये बोलावून कपडे काढायला लावले आणि माझे फोटो काढले. मी त्याला प्रतिकार केला, लाथा बुक्क्या मारल्या पण तरीही त्याने ऐकलं नाही. त्यानंतर मी पोलिसांत तक्रार दिली.

त्याला आता चांगली अद्दल घडली पाहिजे, असं पीडितेने सांगितलं. शिवाय विजय पवार याने देखील असाच त्रास दिल्याचंही विद्यार्थीनीने सांगितलं आहे. दरम्यान, मुलीची आपबिती ऐकल्यानंतर बालकल्याण समितीने पीडीतेला महिला सहायक दिली आहे.

Beed sexual harassment case
Maharashtra Assembly Session : बीड प्रकरणाचा तपास महिला IPS अधिकाऱ्याकडे, CM फडणवीसांची घोषणा

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आणखी कोणी पीडित असेल किंवा कुणाला काही माहिती किंवा पुरावे द्यायचे असतील तर त्यांनी पोलीस अधीक्षक किंवा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन बीड पोलिसांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com