Beed Crime News Sarkarnama
मराठवाडा

Beed News : लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पवार, खाटोकरचा कोठडीतला मुक्काम वाढला!

In the Beed sexual assault case, the police custody of the accused has been extended till July 5 as the investigation continues. : रविवारपासून कोठडीत असलेल्या पवार व खाटोकरच्या कोठडीची मुदत संपल्याने तपास अधिकारी पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी न्यायालयासमोर हजर केले.

Jagdish Pansare

Marathwada News : नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी विजय पवार, प्रशांत खाटोकरचा पेालिस कोठडीतील मुक्काम आणखी वाढला. न्यायालयाने मंगळवारी (ता. एक) या दोघांना पाच जुलैपर्यंत कोठडी सुनावली. आरोपींना अटक केल्यानंतर बीड पोलीसांनी आरोपींसाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा पाच जुलैपर्यंत त्यात वाढ करण्यात आली.

बीड (Beed News) शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलातील प्रोफेशनल कोचिंग क्लासेसमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा वर्षभर लैंगिक छळ केल्याप्रकरणी संचालक विजय दादासाहेब पवार (रा. सहयोगनगर, बीड) आणि शिक्षक प्रशांत भगवान खाटोकर (रा. वडवणी, ह.मु. जवाहर कॉलनी, बीड) या दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद झाला.

फरारी पवार आणि खाटोकरला पोलिसांनी शनिवार-रविवारच्या मध्यरात्री अटक केली. रविवारपासून कोठडीत असलेल्या पवार व खाटोकरच्या कोठडीची मुदत संपल्याने तपास अधिकारी पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी न्यायालयासमोर हजर केले. (Crime News) न्यायालयाने या दोघांना आणखी चार दिवसांची म्हणजे पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, घटनेनंतर विजय पवार, प्रशांत खाटोकर या दोघांना फरार होण्यास मदत करणाऱ्या अजय बोचरे यालाही या गुन्ह्यात सहआरेापी करण्यात आले.

विधीमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी आज या प्रकरणाची चौकशी आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी समिती नेमूण करण्याची घोषणा केली. तसेच पोलीसांनी आरोपींना दोनच दिवसांचा पीसीआर का मागितला? याचीही चौकशी केली जाईल, अशी ग्वाही दिली होती. बीड जिल्ह्यातील आमदार धनंजय मुंडे यांनी पोलीस तपासावर संशय व्यक्त करत पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद असताना आरोपींना दोन दिवसाचा पीसीआर कसा मागितला? असा सवाल केला होता.

दरम्यान, विधान भवन परिसरात आमदार धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणावर माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांनाही क्षीरसागर यांनी उत्तर दिले. एसआयटी चौकशीची घोषणा चोवीस तासात केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी सरकारचे आभार व्यक्त केले होते. तर आरोपी माझ्या जवळचे असले तरी चौकशी करताना मागे पुढे पाहू नका, असे आपण पोलीस अधिक्षकांना सांगितल्याचे क्षीरसागर यांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT