Dhananjay Munde -Devendra fadnavis News sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde : बीड लैगिंक छळ प्रकरणी धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! एसआयटी तपासाची केली मागणी

In the Beed sexual harassment case, Dhananjay Munde met Chief Minister Devendra Fadnavis, urging for a Special Investigation Team (SIT) probe into the incident. : यामध्ये कोणाचे राजकीय संबंध आहेत, घटना घडल्यानंतर कोण कोणाला भेटलं, त्यांच्यात काय बोलणं झालं, फोनवरून काय चर्चा झाली या सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या पाहिजे.

Jagdish Pansare

Assembly Session News : बीड शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस चालक आणि शिक्षकाने एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैगिंक छळ केल्याचा प्रकार दोन दिवसापुर्वी उघडकीस आला. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून बीडमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपींचा संबंध बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी असल्याचा आरोप त्यांचे बंधू योगेश क्षीरसागर आणि आता आमदार धनंजय मुंडे यांनीही केला.

काल बीडमध्ये पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. या संदर्भात आज विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती व निवेदन त्यांना दिले. महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमूण या गंभीर प्रकरणाची चौकशी करावी, आरोपींशी आमदाराचे असलेले कनेक्शन, घटना घडली त्याच दिवशी आमदारांची तिथे असलेली उपस्थिती व इतर गोष्टींचा सखोल तपास होणे गरजेचे आहे.

हे प्रकरण आता फक्त पोलीस तपासापुरते मर्यादित राहिलेले नाही. यामध्ये कोणाचे राजकीय संबंध आहेत, घटना घडल्यानंतर कोण कोणाला भेटलं, त्यांच्यात काय बोलणं झालं, फोनवरून काय चर्चा झाली या सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या पाहिजे. त्यासाठी सीडीआरच नाही तर आईपीआरही तपासला पाहिजे, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली असल्याचे धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

गेल्या वर्षभरापासून कोचिंग क्लासचा मालक आणि त्याचा पार्टनर त्या विद्यार्थीनीचा लैगिंक छळ करत होते. या मुलीचे कुटुंब भेदरले होते, आपल कोणी ऐकलं का? कस बोलावं या विवंचनेत असताना या कुटुंबाच्या मनात आत्महत्येचा विचार आला. हे जेव्हा त्या मुलीला कळाले, तेव्हा तीने हिंमत दाखवून तक्रार दाखल केली. या प्रकरणातील आरोपांना कोणाचे राजकीय पाठबळ आहे. स्थानिक आमदार राहतात ते घर कोणाच्या मालकीचे आहे? याचा शोध पत्रकार म्हणून आपणही घेतला पाहिजे.

मध्यंतरीच्या काळात आपण बरेच दिवस बीडमध्ये आला होतात, आता तुमची शोधपत्रकारिता दिसली पाहिजे. त्या माझ्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आपणही प्रयत्न केला पाहिजे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. पोलीस या प्रकरणाचा तपास आम्ही व्यवस्थित करत आहोत, असे सांगत आहेत. मग पोस्कोसारख्या कायद्यात आरोपींना फक्त दोन दिवसांचा पीसीआर कसा मागितला जातो? कोर्टानेही तो मंजूर केला, न्यायालयाचा तो अधिकार आहे, परंतु या सगळ्या प्रकरणाची एसआयटी समिती मार्फत चौकशी झाली पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT