Dhananjay Munde : 'इतक्या नीच व्यक्तीला इथला आमदार...', बीड कोचिंग प्रकरणावर मुंडे भडकले

Beed Crime : दोन दिवसांपूर्वी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घडना घडकीस आली होती. धक्कादायक म्हणजे ही काळीमा फासणारे कृत्य दोन शिक्षकांनी केल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
Dhananjay Munde On Beed coaching class student assault case
Dhananjay Munde On Beed coaching class student assault casesarkarnama
Published on
Updated on

Beed News : दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात एका विद्यार्थिनीवर कोचिंग क्लासेसमध्येच लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. तर त्या विद्यार्थीनीवर कोचिंग क्लासेसमधीलच दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाल्याने राज्यभर संतापाची लाट उसळी होती. दरम्यान आता दोन्ही नराधम शिक्षकांना सापळा रचून बेड्या ठोकण्यात आल्या असून या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी रोष व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणी त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी आपण अधिवेशनात आवाज उठवणार असून मुख्यमंत्र्यांकडे एसआयटी चौकशीची मागणी करणार असल्याचे म्हटलं आहे. ते पीडित मुलीच्या घरी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. (Dhananjay Munde demands SIT investigation in Beed coaching class student assault case, slams Sandeep Kshirsagar)

यावेळी मुंडे यांनी, बीडमधील विविध कोचिंग क्लासेसमध्ये पाच हजार विद्यार्थी शिकत आहेत. त्यात किती मुलांचे असे लैंगिक शोषण झाले असेल याची कल्पानाही केली जात नाही. यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाण्यासाठी कोचिंग क्लासेसची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी आपण येत्या पावसाळी अधिवेशनात करणार असल्याचे ते म्हणाले.

या प्रकरणातील गुन्हेगार विजय पवार एका भगिनीचा एक वर्षापासून छळ करत होता. ही बीड घटना जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना आहे. याआधीच खूप दिवसापासून याची चर्चा होत होती. पण अनेक लोकांनी आपल्या अब्रू पोटी आवाज उठवला नाही. पण आता त्याच्याविरोधात तक्रार झाली आहे. आता त्याला अटक देखील करण्यात आल्याचे मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटलं आहे.

Dhananjay Munde On Beed coaching class student assault case
Dhananjay Munde News : विपश्यनेनंतर धनंजय मुंडे रमले शिवमहापुराण कथेत!

पण इतके दिवस विजय पवार याला कोणाचे पाठबळ होते. याची देखील माहिती समोर यायला हवी. ही अटक झालेली नसून त्याने सरेंडर केलं आहे. विजय पवार याने छोट्या शिकवणी चालकांना पैशाच्या जीवावर बदनाम केले. त्याने अनेक छोटे क्लासेस दबाव आणून बंद पाडले. ज्या दिवशी त्याच्यावर गुन्हा नोंद झाला त्या रात्री हा आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्यासोबत होता. राजकीय हस्तक्षेपामुळे त्याला हे कृत्य करम्याचे धाडस झाल्याचा आरोपही मुंडे यांनी केला आहे.

क्षीरसागर यांच्यावर निशाना साधताना मुंडे यांनी, इतक्या निच व्यक्तीला क्षीरसागर यांनी शिव जयंतीचा अध्यक्ष केला. त्यामुळे आरोपी आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचे साटेलोटे असून त्यांचे संबंध नेमके काय हे समोर येणे गरजेचे असल्याचही धनंजय मुंडे म्हणाले.

Dhananjay Munde On Beed coaching class student assault case
Dhananjay Munde: विपश्यना करुन घरी परतताच धनंजय मुंडेंनी गाठलं थेट देशमुखांचं घर!

तर आरोपी आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी त्या दिवसाचे तीन सीडीआर काढावेत अशीही मागणी मुंडे यांनी केली आहे. तर या प्रकरणी पावसाळी अधिवेशनात या सर्व प्रकरणात महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. एसआयटी चौकशीसह या प्रकारचा सखोल तपासाची मागणी करणार असल्याचेही मुंडे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com