Laxman Hake 1 Sarkarnama
मराठवाडा

Laxman Hake Allegations : 'खोक्याभाई'नंतर आता आमदार धसांचे पोलिस दलात वसुली एजंट अन् बरचं काही..; लक्ष्मण हाकेंच्या गंभीर आरोपानं खळबळ

Laxman Hake allegations against BJP MLA Suresh Dhas Beed Shirur Satish Bhosale : बीड शिरूर इथं सतीश भोसले याच्या गुंडागर्दीविरुद्ध काढण्यात आलेल्या मोर्चात लक्ष्मण हाके यांचे भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले.

Pradeep Pendhare

Beed Shirur News : भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाई याच्या गुंडगर्दीविरोधात बीडमधील शिरूर इथं मोर्चा काढण्यात आला.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांनी लक्ष करत, जुने गुन्ह्याचे गंभीर संदर्भ समोर आणत, चौकशी मागणी केली. लक्ष्मण हाके यांनी केलेल्या गंभीर आरोपानं खळबळ उडाली आहे.

सतीश भोसले ऊर्फ 'खोक्या'भाईच्या गुंडागर्दीविरोधात आज बीडमधील (BEED) शिरूर इथं बंद पाळण्यात आला. तसेच सर्वपक्षीय मोर्चा काढून निषेध करण्यात आला. या मोर्चात 'ओबीसी' नेते लक्ष्मण हाके यांनी सहभाग घेत, आमदार सुरेश धस यांच्या दिशेने गंभीर आरोप केले.

लक्ष्मण हाके म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना सांगणे आहे की, 'खोक्या'भाई हे हिमनगाचं टोक आहे. जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आकाची व्याप्ती महाराष्ट्राला (Maharashtra) समजणार नाही. 'खोक्या' हा सुरेश धसांसाठी काम करतो, असे इथल्या जनतेचे मत आहे. याची निष्पक्षपाती चौकशी व्हावी". या भाईवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली.

लक्ष्मण हाके यांनी पाटोदा पोलिस ठाण्यातील पोलिसाने 2018 मध्ये केलेल्या घटनेला उजाळा देत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. एका पोलिसाने महिलेवर अत्याचार केला. त्यात भाजप आमदार धस यांचा 'PA' सहआरोपी झाला पाहिजे, असे इथल्या जनतेचे म्हणणे आहे, असे सांगितले.

हा पोलिस सुरेश धसांचा वसुली एजंट आहे. त्याला पोलिस डिपार्टमेंटमध्ये आणण्याची शिफारस कोणी केली, याची चौकशी व्हावी. त्याने इथं येत पुन्हा एका महिलेवर अत्याचार केलाय, त्याला पाठीशी घालणाऱ्यावर सरकार कधी कारवाई करणार, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला.

वन अधिकारी तेवढेच गुन्हेगार

'खोक्या'ने शिरूर परिसरातील केलेल्या वन्य प्राण्याच्या शिकारींवरून लक्ष्मण हाके यांनी वन विभागाच्या कारभारावर गंभीर आरोप केले. वन विभाग नक्की काय करत आहे? मेंढपाळाच्या चार मेंढ्या वनात गेल्या, तर त्याला सोलून काढणारं वन विभाग 200 हरण मारली गेली, तेव्हा काय करत होते? हरणांचे हे मांस डब्बे भर भरून आमदार धसांच्या घरी जात असल्याचीही चर्चा आहे. ही सर्व बघ्याची भूमिका घेणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी लक्ष्मण हाकेंनी केली.

प्राचार्यांवर गुन्हा नोंदवा

कालिकादेवी महाविद्यालयात शिक्षकांसमोर तिसरी-चौथी पास झालेला हा गुन्हेगार खोक्या भाषण करतो. त्यात 'खोक्या' हा महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमोर लहान मुलांना हातपाय तोडण्याची धमकी देतो. तिथल्या शिक्षकांवर प्राचार्यांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची गृह विभागाला विनंती आहे, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT