Beed Crime : बीडमधील विलास घुले यांच्या हत्येचा तपास अखेर पूर्ण झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात सीआयडीने केजच्या न्यायालयात 10 आरोपींविरोधात 200 पानी दोषारोपपत्र सादर केले आहे. या दोषारोपपत्रात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे याचे नाव नसल्याची माहिती पोलिसांमधील सुत्रांनी दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल मालक विलास घुले यांची भांडण सोडवण्यासाठी गेले असताना हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाची आधी एसआयटी चौकशी आणि नंतर तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला.
या प्रकरणात घुले कुटुंबियांकडून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे याच्यावर हत्या प्रकरणात आरोपींना मदत केल्याचा ठपका ठेवत अटकेची मागणी केली होती. रास्तारोको, बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करत घुले कुटुंबिय आक्रमक झाले होते.
पोलीसांनी सुरुवातीच्या तपासात सौरभ सोनवणे यांच्या सीडीआर, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती. यात सोनवणेंचा या हत्या प्रकरणात सहभाग किंवा आरोपींना मदत केल्याबद्दल कुठलाही पुरावा आढळला नव्हता, असे सांगण्यात आले होते. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी देखील सौरभ सोनवणे याची दोनदा चौकशी केली होती.
मात्र विलास घुले यांचे बंधू व कुटुंबिय आपल्या आरोपांवर ठाम होते. या दरम्यान, पुरवणी जबाबात सौरभ सोनवणेचं नाव घेण्यात आलं होतं. या पलिकडे पोलिसांकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. आता दोषारोपपत्र सादर करण्यात आल्यानंतर आता सौरभ सोनवणे याला दिलासा मिळणार की अडचण वाढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
15 सप्टेंबर रोजी दोषारोपपत्र दाखल :
घुले यांच्या हत्या प्रकरणाला मराठा विरुद्ध वंजारी अशी जातीयवादाची आणि राजकीय किनार मिळाल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणात सीआयडीने तपास पूर्ण करत 10 आरोपींविरोधात 200 पानी दोषारोपपत्र सादर केल्याची माहिती आहे. 15 सप्टेंबर रोजी केज न्यायालयात हे दोषारोपण दाखल करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.