NCP SP leader office set on fire in Beed Sarkarnama
मराठवाडा

Crime News : NCP SP नेत्याचे संपर्क कार्यालयच अज्ञाताने पेटवून दिलं; कागदपत्रे जळून खाक, CCTV कॅमेऱ्यात घटना कैद

Beed NCP SP Leader Mahadev Jamale Office Fire : बीडमध्ये खळबळजनक घटना घडली असून राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांचे कार्यालयच अज्ञाताने पेटवून दिल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Aslam Shanedivan

Beed NCP SP contact office fire incident: बीड जिल्ह्यातील वडवणीमध्ये धक्कादायक घटना समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या तालुकाध्यक्षाचे कार्यालय पेटवून दिले आहे. ही घटना सोमवारी (ता. 20) मध्यरात्री घडली असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर हे कार्यालय महादेव जमाले यांचे आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव जमाले यांचे संपर्क कार्यालय वडवणीमधील वसंतराव नाईक चौकात आहे. सोमवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने कार्यालय परिसरात येऊन कार्यालयाला आग लावली.

यानंतर आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट उठले. या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसताच शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तात्काळ स्थानिकांनी याची माहिती अग्निशामक विभागाला दिली. माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, या आगीत कार्यालयातील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य जळून खाक झाले आहे. कार्यालयाचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवत आहेत. या घटनेमागे नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे. तसेच राजकीय वैमनस्य आहे की अन्य काही, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, या घटनेने वडवणी शहर आणि परिसरासह राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT