Crime News : अश्लील व्हिडिओ पाठवले, नको ते बोलला..., २६ वर्षीय विवाहितेचा विनयभंग, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा

Bajrangdal Molestation Woman Karan Ullegal : मध्यरात्री सुमारे पावणे दोनच्या सुमारास आरोपीने अश्लील व्हिडिओ पाठविले आणि घाणरेडे मेसेज करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Karan Ullegal Faces FIR for Molesting Married Woman
Karan Ullegal Faces FIR for Molesting Married WomanSarkarnama
Published on
Updated on

Bajrang Dal worker booked for molestation: डोंबिवलीतील एका २६ वर्षीय विवाहित युवतीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवून तसेच अश्लील संदेश आणि शरीरसुखाची मागणी करत तिच्या विनयभंगाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण उल्लेगल (वय ३५) असे आरोपीचे नाव असून, तो बजरंग दलाचा कार्यकर्ता तसेच कल्याण विभाग संयोजक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवती ही डोंबिवली पूर्वेतील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी असून तिचे लग्न झालेले आहे. गेल्या चार महिन्यांपासून ती पतीपासून विभक्त राहत आहे. आरोपी करण उल्लेगल हा तक्रारदार युवतीच्या काकांचा मित्र असल्याने गेल्या सुमारे २० वर्षांपासून दोन्ही कुटुंबांची ओळख आहे. या परिचयाचा गैरफायदा घेत आरोपीने मागील चार महिन्यांपासून युवतीशी संवाद वाढविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

बुधवारी मध्यरात्रीनंतर सुमारे पावणे दोनच्या सुमारास आरोपीने युवतीच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठविल्याचा आरोप आहे. त्यानंतर अश्लील स्वरूपाचे संदेश पाठवत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तक्रारदार युवती आरोपीला "दादा" म्हणून संबोधत होती. तिने "तू माझ्यासाठी दादासारखा आहेस," असे सांगून त्याच्या वर्तनावर आक्षेप घेतला असता, "मला भावना येऊ शकत नाहीत का?" असे म्हणत आरोपीने आणखी आक्षेपार्ह संदेश पाठविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Karan Ullegal Faces FIR for Molesting Married Woman
Maharashtra News Live Update : कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना गावगुंडांकडून मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या युवतीने रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपी करण उल्लेगल याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपी बजरंग दलाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाची राजकीय व सामाजिक स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे.

Karan Ullegal Faces FIR for Molesting Married Woman
Mumbai Crime News : विकृतीचा कळस! मुंबईत नसरापूरची पुनरावृत्ती 7 वर्षांच्या चिमुकलीवर शौचालयात अत्याचार; आरोपी गजाआड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com