Mla Prakash Solanke-Jaysingh Solanke News, Beed Sarkarnama
मराठवाडा

Beed : लाडक्या पुतण्याला काका विधानसभेची संधी देणार का?

मागच्या वेळच्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश सोळंके यांनी ही आपली शेवटची निवडणुक असल्याचे सांगत प्रचार केला होता. पुढचा उमेदवार कोण असेल हे मात्र त्यांनी गुलदस्त्यातच ठेवलेले आहे. (Beed News)

Datta Deshmukh

बीड : जिल्ह्यात व राज्यात `काका-पुतणे` अंकांच्या माळेत रोज नवा मनी ओवला जात असताना जिल्ह्यातील एका राजकीय घराण्यातील काका-पुतण्याचे प्रेम दिसून आले आहे. (Beed) मी दादांचा लाडका आहे, जिल्ह्यात दुसरा कोणताच पुतण्या नसेल जेवढा मी चुलत्याच्या लाडाचा असेल, असे म्हणत माजी सभापती जयसिंग सोळंके यांनी आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) या आपल्या काकांबद्दलच्या नात्याची विण घट्ट असल्याचे सांगितले.

माजलगाव तालुक्यात विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. जयसिंह सोळुंके म्हणाले, अनेक लोक वाट बघतात, काही तरी होईल, मी काही तरी म्हणेल, दादा (प्रकाश सोळंके) काहीतरी म्हणतील.(Marathwada) त्यासाठी मतदार संघातले व बाहेरचेही लोक प्रयत्न करत असतात. मात्र, माझ्याकडे इतके लाड करणारे चुलते आहेत हे माझे नशिबच म्हणावे लागेल.

राज्यात चुलते पुतणे असे राजकारणात अनेक अंक गाजले आहेत. ठाकरे, तटकरे यासह जिल्ह्याला चुलते-पुतणे राजकारण नवे नाही. यात पुतण्याचे पहिले बंड पंडित घराण्यात घडले. पुतणे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी चुतले व जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांच्या विरोधात बंड पुकारले होते. त्यानंतर मुंडे कुटूंबियांतही काका-पुतणे राजकीय घामासान पहायला मिळाले.

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात पुतणे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही बंड पुकारले होते. तर, क्षीरसागर घराण्यातही काका-पुतणे अंक सध्या जोरात गाजत आहे. काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात पुतणे संदीप क्षीरसागर यांनी बंड पुकारले.

यातील बहुतांशी पुतण्यांनी राजकीय यशाच्या शिढ्याही चढल्या आहेत. जयसिंग सोळंके हे आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारणात आल्यानंतर पंचायत समितीचे उपसभापती व नंतर जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली ती काकांमुळेच.

मात्र, मागच्या काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची चाहूल लागल्यानंतर जयसिंग यांनी स्वत: ऐवजी पत्नीसाठी तयारी सुरु केली होती. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत जयसिंग सोळंके माजलगावमधून लढणार, अशी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे मागच्या वेळच्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश सोळंके यांनी ही आपली शेवटची निवडणुक असल्याचे सांगत प्रचार केला होता.

पुढचा उमेदवार कोण असेल हे मात्र त्यांनी गुलदस्त्यातच ठेवलेले आहे. पुत्र विरेंद्र सोळंके कृषीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. तर, स्नुषा सामाजिक, शिक्षण व महिलांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्यामुळे सोळंके यांचा राजकीय वारसा पुढे मुलगा, सून चालवणार? का मग लाडक्या पुतण्याला ते संधी देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT