Beed Pankaja Munde Dasara Melawa News Sarkarnama
मराठवाडा

Beed : विखे, जानकरांकडून शुभेच्छा, पण पकंजांचे लक्ष्य २०२४ च्या विधानसभेकडेच ?

पंकजा मुंडे यांनी मात्र आपल्या भाषणात आता आपल्याला कुठल्याच पदाची अपेक्षा नाही. आपले लक्ष हे २०२४ च्या परळी विधानसभेकडे आहे. त्याच्या तयारीला लागा, असे आवाहन उपस्थितांना केले. (Beed News)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर मेळावा पार पडला. या मेळाव्याला राज्यातील कुठलाही मोठा नेता उपस्थितीत नसला तरी पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, (Mahadev jankar) नगरचे खासदार सुजय विखे, (Sujay Vikhe) मोनिका राजळे, मेघाना बोर्डीकर, शिवाजी कर्डिले आणि जिल्ह्यातील भाजपचे नेते आवर्जून उपस्थितीत होते.

पैकी व्यासपीठावर बोलण्याची संधी जानकर आणि विखे यांनाच मिळाली. अवघ्या पाच मिनिटांच्या आपल्या भाषणात या दोघांनी देखील पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना लवकरच पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळेल, अशा सदिच्छा दिल्या. पंकजा मुंडे यांनी मात्र आता आपल्याला विधान परिषद किंवा इतर कुठल्या संधीची अपेक्षा नाही. आपले लक्ष्य आता २०२४ च्या परळी विधानसभा निवडणुक असणार असल्याचे स्पष्ट केले.

भगवान भक्तीगडावर हजारोंच्या गर्दीला पंकजा मुंडे यांनी संबोधित केले. दरवर्षी या मेळाव्याला केंद्र किंवा राज्यातला भाजपचा मोठा नेता हजेरी लावत असतो. अगदी देशाचे गृहमंत्री अमित शहा, चंद्रकात पाटील यांच्यासह अनेकांनी या दसरा मेळाव्याला हजेरी लावलेली आहे. यंदा मात्र भाजपचा कोणताच मोठा पंकजा यांच्या व्यासपीठावर दिसला नाही.

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर याही वेळी न चुकता मेळाव्याला हजर होते. या शिवाय नगरचे खासदार डाॅ. सुजय विखे यांची उपस्थिती देखील आश्चर्यकारक होती. पंकजा मुंडेंच्या भाषणा आधी या दोन्ही नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली.

महादेव जानकर म्हणाले, पंकजा मुंडे या मेळाव्याला खासदार सुजय विखे यांच्या हेलिकाॅप्टरमधून आल्या. पण पुढच्यावेळी त्या महाराष्ट्र शासनाच्या हेलीकाॅप्टरमधून मेळाव्याला येतील. जानकरांच्या या शुभेच्छांकडे पंकजा यांना राज्यात किंवा केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार का? या दृष्टीने पाहिले जात आहे.

तर सुजय विखे यांनी देखील आपल्या काही मिनिटांच्या मनोगतामध्ये पंकजा यांना लवकरच पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगितले. पंकजा मुंडे यांचे पक्षासाठी आणि समाजासाठी मोठे योगदान आहे, त्याची दखल पक्षाकडून नेहमीच घेतली जाते. लवकरच त्यांच्यावर नवी जबाबदारी पक्षा सोपवेल, अशा शुभेच्छा विखे यांनी मेळाव्यात बोलतांना दिल्या.

त्यामुळे पंकजा यांच्यावर पक्ष नेमकी कोणती जबाबदारी देणार? याची उत्सूकता त्यांच्या समर्थकांना लागली. परंतु पंकजा मुंडे यांनी मात्र आपल्या भाषणात आता आपल्याला कुठल्याच पदाची अपेक्षा नाही. आपले लक्ष हे २०२४ च्या परळी विधानसभेकडे आहे. त्याच्या तयारीला लागा, असे आवाहन उपस्थितांना करत या चर्चांना पुर्णविराम दिल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT