Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde: "बीआरएसच्या आधीच पंकजा मुंडे यांना होती 'एमआयएम'ची ऑफर"

Asaduddin Owaisi About Pankaja Munde: 'एमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Political News: तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या 'बीआरएस' पक्षाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता 'एमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

"'बीआरएस'पक्षाच्या आधी दोन वर्षापूर्वीच 'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना 'एमआयएम'मध्ये येण्याची ऑफर दिली होती", असा गौप्यस्फोट असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

असदुद्दीन ओवैसी नेमकं काय म्हणाले?

"'बीआरएस'पक्षाच्या आधी दोन वर्षापूर्वीच'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना 'एमआयएम'मध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण त्या समजून घेत नाहीत. पक्षी वातावरण पाहून पावसाचा अंदाज लावतात. तसं पंकजा मुंडे यांना देखील याचा विचार करण्याची गरज आहे. प्रत्येकजण आपआपला पक्ष वाढवू शकतो. हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे", असं यावेळी ओवैसी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक चांगले होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा अमेरिकेत प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना सामोरे गेले आहेत. नाही तर ते त्यांच्या आवडीच्या निवेदकांना बोलवून मुलाखती देतात", असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी आपला पक्ष भारत राष्ट्र समिती (बीआरएस) महाराष्ट्रात मजबूज करण्याच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रयत्न सुरू केले आहेत. या अनुषगांनेच सध्या महाराष्ट्रातील अनेकांचा 'बीआरएस'मध्ये पक्ष प्रवेश होत आहे.

त्यातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही 'बीआरएस'ने मोठी ऑफर दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनी याबद्दल अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच आता 'एमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आता यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT