Sujeet Patkar News : संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना न्यायालयाचा मोठा दिलासा !

Crime Filed Against Sujeet Patkar : विशेष न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला दिले आदेश..
Sujeet Patkar News :
Sujeet Patkar News : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : सुजीत पाटकर यांच्याशी संबंधित प्रकणांमध्ये दोन दिवसापूर्वी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीकडून धाड टाकण्यात आली होती. सुजीत पाटकर (ए हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र आता न्यायालयाने पाटकर यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. (Latest Marathi News)

Sujeet Patkar News :
Modi State dinner in US : गुगल सीईओ ते मुकेश अंबानी या भारतीय दिग्गजांनी लावली 'स्टेट डिनर'ला हजेरी

कोव्हीड काळातील लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात सुजीत पाटकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात पाटकर यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. ११ जुलैपर्यंत सुजीत पाटकर यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश विशेष न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत.

Sujeet Patkar News :
ED Raid On Sujeet Patkar : संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांच्या कार्यालयावर ईडीची धाड; काय आहे प्रकरण?

कोरोनाकाळात मुंबईत कथित कोविड घोटाळा प्रकरणात राज्यभरात ईडीने छापेमारी केली होती. आता उद्योजक सुजित पाटकर यांना दिलासा मिळत आहे. मुंबईतील वरळी आणि दहिसर या ठिकाणी जम्बो कोविड सेंटरचं पाटकर यांनी काँन्ट्रॅक्ट मिळवलं होतं. पाटकरांनी खोटी कागदपत्रे जमा केल्याचा आरोपाची चौकशी करण्यात येत होती.आता या प्रकरणी ११ जुलैपर्यंत सुजीत पाटकरांवर अटकेची कारवाई करू नये, असे आदेश विशेष न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com