vijay wadettiwar,Congress
vijay wadettiwar,Congress Sarkarnama
मराठवाडा

सत्तेत असून न्याय मिळत नाही, पण भाजपला खाली खेचायचेय म्हणून समजून घ्यावे लागते..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : गेल्या महिन्यात औरंगाबाद दौऱ्यावर असलेले राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सरकारमध्ये असून देखील आपली कामे होत नाहीत, न्याय मिळत नाही, अशी नाराजी व्यक्त केली होती. (Congress) आता राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी देखील काॅंग्रेसला न्याय मिळत नसल्याची, खंत व्यक्त केली. पण भाजपला रोखायचे असल्यामुळे समजून घ्यावे लागते, असेही ते म्हणाले. (Aurangabad) ससत्तेतील इतर पक्षांचे पालकमंत्री कॉंग्रेसच्या नेत्यांना न्याय देत नसल्याचे सांगत या विषयावर आपण मंत्रीमंडळ बैठकीत बोलणार असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काॅंग्रेसमधील मंत्र्यांकडून अधूनमधून नाराजीचा सूर आळवला जातो. यात प्रामुख्याने महत्वाचे निर्णय घेतांना विश्वासात घेतले जात नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेत जिथे काॅंग्रेसची सत्ता आहे तिथे निधी देतांना भेदभाव केला जातो. पदाधिकाऱ्यांची, नेत्यांची कामे होत नाही, असा आरोप अगदी बाळासाहेब थोरांतापूसन जिल्हा पातळीवरच्या काॅं्गेस नेत्यांनी अनेकदा केल्याचे दिसून आले. आता पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील आपल्या मनातील सल कार्यकर्त्यासमोर बोलून दाखवली.

औरंगाबादेत आयोजित मेळाव्यात बोलतांना वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये काॅंग्रेसचे पालकमंत्री नाहीत, तिथे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आम्हाला न्याय मिळत नाही हे अनेकदा दिसून आले आहे. ही गोष्ट मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि सरकारी पातळीवर देखील मांडण्याचा वारंवार प्रयत्न करतो. एका अर्थाने मी वकिलीच करतोय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मंत्रीमंडळ बैठकीत देखील मी हा मुद्दा मांडणार आहे.

राज्यात भाजपला रोखायचे हे महाविकास आघाडीचे प्रमुख ध्येय आहे. त्यांची संख्या १०६ वरून २५ आणायची असल्याने काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते, समजून घ्यावे लागते, असेही वडेट्टीवार म्हणाले. भाजपकडून सातत्याने हिंदू -मुस्लिम समाजात वाद निर्माण करण्याचे काम भाजपकडून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याला पायबंद घालायचा असेल तर आपल्याला शक्ती वाढवावी लागेल.

औरंगाबाद सारख्या संवेदनशील शहरात आपला पक्ष मजबुत झाला पाहिजे, जेव्हा हे घडेल तेव्हाच दिल्लीतही आपली ताकद वाढेल, असा विश्वा करत त्यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केले. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा सल्लाही दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT