Mahant Namdevshastri Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde Resignation : आधी संतपदापर्यंत पोहोचवलं, पण मुंडेंचा राजीनामा येताच नामदेवशास्त्रींनी बोलणंच टाळलं

Bhagwangad Mahant Namdevshastri avoid commenting Beed Dhananjay Munde resignation : भगवानगडचे महंत नामदेवशास्त्री यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी बीडचे धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

Pradeep Pendhare

Beed News Update : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यानंतर राज्यात संपाताची लाट उसळली असून, बीडमध्ये अघोषित बंद पुकारला आहे. यातून निर्माण झालेल्या दबावातून धनंजय मुंडे यांनी देखील आज राजीनामा दिला.

काही दिवसांपूर्वी मुंडेंची पाठराखण केल्याने भगवानगडावरील महंत नामदेवशास्त्री महाराजांविरोधात महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. आता मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती बिघडल्याचे कारण देत, नामदेवशास्त्री महाराज यांनी यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल झाले आहे. या दोषारोपपत्राबरोबर पोलिसांनी घटनेचे फोटो अन् व्हिडिओ देखील दाखल केलेत. ते समाज माध्यमांवर कालपासून वेगानं व्हायरल झाले. यावरून संतापाची लाट महाराष्ट्रात उसळली आहे. यातूनच दबाव येत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रि‍पदाची राजीनामा दिला.

धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचे कारण वैद्यकीय सांगितले असेल, तरी त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नैतिकतेतून राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा संस्थापक सदस्य छगन भुजबळ यांनी देखील नैतिकतेतून राजीनामा दिल्याचे म्हणत आहे. मुंडे राजीनामा दिल्याचे आणि पक्षाचे प्रमुख नेते सांगत असलेल्या कारणांमध्ये विसंगती आल्याने देखील संताप व्यक्त होत आहे.

महंत नामदेवशास्त्रींची प्रकृती बिघडली

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया येत असताना, त्यांची याच मुद्यावर काही दिवसांपूर्वी पाठराखण करणारे महंत नामदेवशास्त्री महाराज काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष लागले होते. माध्यम प्रतिनिधींनी भगवानगडावर जात, त्यांच्याशी संपर्क केला. परंतु त्यांनी प्रकृती बिघडल्याचे कारण देत माध्यमांना टाळले.

मुंडेंची अशी केली होती पाठराखण

धनंजय मुंडेंच्या पाठीशी भगवान गड भक्कमपणे उभा असून मुंडे गुन्हेगार नाहीत, असं नामदेव शास्त्रींनी म्हटले होते. यावरून नामदेवशास्त्री महाराजांवर चौहू बाजूने टीका झाली. अनेक ठिकाणचे त्यांचे कार्यक्रम रद्द झाले. समाज माध्यमांवर देखील त्यांना ट्रोल करण्यात आले. यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मागे घेत, न्यायाच्या बाजूने असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT