
Beed Protest Today : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बीडमध्ये आज स्वयंघोषित कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.
संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ युवकांनी बीड शहरातील रॅली काढून बीड बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून, पोलिसांनी बीडसह मस्साजोग गावात बंदोबस्त वाढवला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे दोषारोपपत्र 'एसआयटी'ने विशेष न्यायालयात दाखल केले. यात संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ जोडण्यात आले आहेत. यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ काल रात्री समाज माध्यमांवर व्हायरल झाले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याचबरोबर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा दबाव वाढला होता.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्याचे पडसाद पहिले उमटले ते, बीड (BEED) जिल्ह्यात! संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ आणि मारेकऱ्यांच्या निषेधार्थ बीडमध्ये नागरिक एकवटले होते. यावेळी नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया होत्या.
बीड जिल्हा बंदची आज हाक देण्यात आली आहे. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बीडचे नागरिक एकत्र जमून घोषणाबाजी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्याती आली. आकाची टोळी, असे फलक झळवण्यात आले.
बीड बंद यशस्वी होण्यासाठी युवकांनी दुचाकीवरून निषेध रॅली काढली होती. या रॅलीत शंभर पेक्षा जास्त युवक सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर, लातूर, पंढरपूरमध्ये देखील याचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. बीडमधील केजमध्ये अजित पवार, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याचे छायाचित्र असलेले बॅनर टायरसह जाळण्यात आले. तत्पूर्वी आंदोलकांनी यांच्या बॅनरला चप्पला मारल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.