Bhagwat Karad Sarkarnama
मराठवाडा

Bhagwat Karad on Manoj Jarange : 'जरांगेंच्या आंदोलनाचा मराठवाड्यात काहीप्रमाणात भाजपला फटका बसला' ; कराडांनी बोलून दाखवलं!

योगेश फरपट

Bhagwat Karad at Akola : आरक्षणाच्या मुद्यावर सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनांचा फटका मराठवाड्यात काही प्रमाणात निश्‍चित बसला. आगामी काळात या मुद्याच्या अनुषंगाने प्रदेश नेतृत्व, सरकार योग्य तो तोडगा काढेल, असे सूचक विधान माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी अकोला येथे केले.

भाजपच्या (BJP) कोअर कमिटीच्या बैठकीसाठी डॉ. कराड गुरुवारी अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी दुपारी लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांची बैठक घेत निकालाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, किशोर मांगटे पाटील, विजय अग्रवाल, जयंत मसने, गिरीश जोशी आदी उपस्थित होते.

राज्यात लोकसभा निवडणुकीत आलेल्या यशापयशाचे चिंतन करण्यासाठी भाजपकडून प्रत्येक मतदार संघांचा आढावा घेतला जात आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चर्चा केली असून आपण याबाबतचा अहवाल प्रदेश नेतृत्वाला देऊ, असे सांगण्यात आले.

याशिवाय भागवत कराड(Bhagwat Karad) पुढे म्हणाले, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या काळात नकारात्मक प्रचार करीत मते मिळवण्याचा प्रयत्न केला. भाजपा सत्तेत आली तर संविधान बदलेल, असे सभांमधून सांगितले गेले. महिलांना वर्षाला लाख रुपये देण्याचे खोटे आश्‍वासन दिले. याचा थोडाफार फटका भाजपला बसला असू शकतो.

मात्र, भाजपने विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवली. मोदींच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात अमुलाग्र बदल करण्याचे काम झाले. देशाची अर्थव्यवस्था 14व्या स्थानावरून वर आली. आता जागतिक अर्थव्यवस्था बनवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने काम केले. काही ठिकाणी विजय मिळाला. काही मतदार संघात अपयश आले. या सर्व ठिकाणांचा अहवाल एकत्रित करून त्यावर चिंतन होईल. त्यानंतर पुढील दिशा ठरेल असेही ते म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT