Abhimanyu Pawar Meet Manoj Jarange : फडणवीस यांचे विश्वासू अभिमन्यू पवार जरांगेंना भेटले; म्हणाले 'गैरसमज दूर केले...'

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान, अभिमन्यू पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात मनोज जरांगे पाटील यांना अटक करा, अशी मागणी केल्यामुळे त्यांच्यावर समाजाचा राग होता.
Abhimanyu Pawar-Manoj Jarange patil
Abhimanyu Pawar-Manoj Jarange patilSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar, 20 June : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार अभिमन्यू पवार यांनी आज (ता. २० जून) सकाळी अकराच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांची संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान, अभिमन्यू पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात मनोज जरांगे पाटील यांना अटक करा, अशी मागणी केल्यामुळे त्यांच्यावर समाजाचा राग होता.

या भेटीत त्या संदर्भात जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा केली, अशी कुठलीही मागणी आपण केली नव्हती. विरोधकांनी माझ्या विरोधात पसरवलेली ही खोटी चर्चा होती. आपल्या मनात काही गैरसमज असतील तर ते काढून टाका, मी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याच भूमिकेचा असून माझा आपल्या मागण्यांना पाठिंबा असल्याचे त्यांना सांगितल्याचे आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

आजच्या भेटीनंतर प्रसार माध्यमावर येत असलेल्या बातम्या खोट्या असून माझ्याबद्दल मनोज जरांगे पाटील व त्यांच्या समर्थकांमध्ये जे गैरसमज होते, ते मी दूर करण्याचा प्रयत्न केला. मागे अंतरवाली सराटीला गेलेल्या शिष्टमंडळात माझाही समावेश होता. पण एका पूर्वनियोजित सोयाबीन परिषदेसाठी इंदौरला जावे लागल्याने मी तेव्हा जाऊ शकलो नव्हतो.

माझ्या राजकीय विरोधकांनी मागच्या काळात काही चुकीच्या बातम्या प्रसारित करुन समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत त्यांना वस्तुस्थिती अवगत करून दिली.

या वेळी मराठा आरक्षण, सगेसोयरे अंमलबजावणी व मराठा समाजाला भेडसावणाऱ्या इतर प्रश्नांबाबत सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली. यावेळी त्यांना उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा देऊन समाजाच्या लढ्यात ताकदीने सोबत असल्याचा विश्वास दिल्याचे पवार यांनी सांगितले.

Abhimanyu Pawar-Manoj Jarange patil
Praniti Shinde : आता भाजपचा त्रास सहन करायचा नाही; आता त्रास देण्याची वेळ : प्रणिती शिंदेंचे विधान

हैदराबादचे गॅझेट स्वीकारणे, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्यानंतरही तिथले जिल्हाधिकारी सहकार्य करत नसल्याबद्दल जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. सगेसोयरेचा निर्णय घेण्यास विलंब होत आहे, पोलिस भरतीची मुदत वाढवून देण्यासंदर्भात शंभूराज देसाई यांनी आश्वासन दिले होते. याची आठवण सरकारला करून द्या, असेही जरांगे पाटील यांनी सांगितल्याचे पवार म्हणाले.

तत्पुर्वी मनोज जरांगे पाटील यांनी 8 जूनपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले त्या दरम्यान मुख्यमंत्र्यांना भेटून मराठा आरक्षण विषयासंदर्भात बोललो होतो. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून सरकारने तातडीने त्यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढावा, अशी विनंती त्यांना केली होती, याची माहिती जरांगे पाटील यांना दिल्याचे पवार यांनी सांगितले.

Abhimanyu Pawar-Manoj Jarange patil
Dhairyasheel Mohite Patil : चंद्रकांतदादांचं माझ्यावर विशेष प्रेम, निधीत झुकतं माप देतील; मोहिते पाटलांकडून पाटलांचे कौतुक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com