Ashok Chavan Bharat Jodo Yatra News Nanded.
Ashok Chavan Bharat Jodo Yatra News Nanded. Sarkarnama
मराठवाडा

Bharat Jodo : `मी पण चालणार`, अशोक चव्हाणांकडून सराव सुरू..

सरकारनामा ब्युरो

नांदेड : माजी मंत्री तथा काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण सध्या राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या नांदेड जिल्ह्यातील आगमानाच्या जय्यत तयारीत व्यस्त आहेत. काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या यात्रेचा जिल्ह्यातील प्रवास कसा असेल? कोण कोण नेते यात सहभागी होतील याची माहिती दिली.

भारत जोडो यात्रेला कोणत्याही राजकीय पक्षाचा उपक्रम म्हणून न पाहता यात सगळ्या पक्ष, संघटना, संस्था आणि सर्वसामान्यांनी सहभागी व्हावे, यासाठी `मी पण चालणार`, या घोषवाक्याखाली एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. (Ashok Chavan) दररोज २४ किलोमीटरची पदयात्रा या भारत जोडो दरम्यान काढण्यात येणार आहे. (Nanded)

नांदडमध्ये चार दिवस ही यात्रा मुक्कामी असणार आहे. त्यामुळे राहूल गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून पदयात्रेत सहभागी होण्यासाठी अशोक चव्हाण यांनी चालण्याचा सराव सुरू केला आहे. आज सकाळी अशोक चव्हाण नांदेडमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत चालण्याचा सराव करतांना दिसले. माजी मंत्री डी.पी.सावंत, आमदार अमर राजूकर हे देखील चव्हाणांसोबत चालण्याचा सराव करत आहेत.

भारत जोडो यात्रा हा देशपातळीवरील उपक्रम असला तरी त्याचा महाराष्ट्रातील मार्ग हा नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्हयातूनच जाणार आहे. नांदेड हा अशोक चव्हाण आणि पर्यायाने काॅंग्रसेचा गड म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अशोक चव्हाण यांना बळ देण्यासाठीची यात्रा म्हणून देखील याकडे पाहिले जात आहेत.

भाजप प्रवेशाच्या वावड्या सुरू असतांना अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेची संपुर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्याचे दिसून येत आहे. यातून आपला निर्णय पक्का आहे, आपण काॅंग्रेसमध्येच मोठ्या मजबुतीने उभे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न देखील चव्हाणांकडून होतांना दिसतो आहे.

मी पण चालणार या घोषवाक्याच्या माध्यमातून नांदेडवासियांना चव्हाणांकडून भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला किती प्रतिसाद नांदेडकर देतात हे येत्या ७ ते १२ नोव्हेंबर दरम्यान स्पष्ट होईल. तुर्तास चव्हाण यांच्या चालण्याच्या सरावाची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच होतांना दिसते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT