Bhimrao Dhonde  Sarkarnama
मराठवाडा

Bogus Voter Registration in Ashti : आष्टी मतदारसंघात बोगस मतदारांची नावनोंदणी; माजी आमदारांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

MLA bhimrao Dhonde Complaint Election Commission : बोगस मतदार नाव नोंदणीत त्यांनी स्थानिक प्रशासनाचाही हातभार असल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणीही माजी आमदार यांनी केली.

Dattatrya Deshmukh

Beed Politics : जिल्ह्यातील आष्टी-शिरुर, कासार-पाटोदा मतदारसंघातील स्थानिक रहिवासी नसलेल्या शेजारील जिल्ह्यातील मतदारांची बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रशासनाच्या सहकार्याने बनावट मतदार नावनोंदणी सुरू असल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी भाजपच्याच माजी आमदारांनी निवडणूक आयोगाकडे केला आहे.

बोगस मतदार नाव नोंदणीत त्यांनी स्थानिक प्रशासनाचाही हातभार असल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणीही माजी आमदार भीमराव धोंडे (Bhimrao Dhonde) यांनी केली.

विधानसभा निवडणुकीचे (Vidhan sabha Election) पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. शासनाकडून विविध योजनांच्या घोषणांचा पाऊस पडत आहे. राजकीय पक्षही जिल्हानिहाय दौरे काढत आहेत. प्रशासकीय पातळीवरही निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका, मतदार नोंदणी सुरु आहे. आता यातच भाजपचेच माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बोगस मतदार नोंदणीचा आरोप केला आहे.

याबाबत त्यांनी बीडचे (Beed) जिल्हाधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघ हा तीन तालुक्यांचा आहे. यात आष्टी, पाटोदा व शिरुर कासार या तीन तालुक्यांचा समावेश आहे. यातील आष्टी तालुक्याच्या तिनही बाजूंनी अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे. या लगतच्या गावांत मतदान वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा भीमराव धोंडे यांचा आरोप आहे.

यापूर्वीच्या काही निवडणुकांमध्ये देखील कार्यक्षेत्राबाहेरील मतदारांची नोंदणी झाली होती. या मतदारांनी निवडणुकीत मतदानही केले होते, असे त्यांनी जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी स्थानिक प्रशासनावरही आरोप केले आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघात प्रशासनाच्या सहकार्याने आवश्यक मतदानाची जुळवाजुळव करून बनावट कागदपत्रांच्या आधारे स्थानिक रहिवासी नसलेल्या बाहेरील मतदारांची नावे समाविष्ट करण्यात येत आहे. संशयास्पद वाटणाऱ्या मतदारांच्या कागदपत्रांची कोणतीही तपासणी न करता बीएलओ मतदार नाव नोंदणी करत असल्याचे भीमराव धोंडे (Bhimrao Dhonde) यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT