Nanded News : राज्यातील राजकीय वातावरण मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच तापलेले आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून आंदोलक आक्रमक झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला होता. भाजप खासदार असलेल्या अशोक चव्हाण यांचा गड असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी बाजी मारली होती.
भोकर विधानसभेतून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) यांच्या कन्या श्रीजया चव्हाण निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी चव्हाण कुटुंबीयांचे गावोगावी भेटीगाठी सुरू आहेत. त्याचवेळी मराठा आरक्षणासाठी तुमची भूमिका काय ? असा जाब विचारत गावभेटीसाठी गेलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांना रविवारी मराठा आंदोलकांनी अडवले. (Maratha Reservation News)
भोकर विधानसभा मतदारसंघातील गणपूर येथे हा प्रकार घडला. या विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी चव्हाण कुटुंबीयांकडून गावभेटी सुरू आहेत. माजी आमदार अमिता चव्हाण (Amita Chavan) ह्या अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे गावभेटीसाठी गेल्या होत्या. परत येताना त्यांना मराठा आंदोलकांनी अडवले. आता तुम्ही भाजपमध्ये आहात, मराठा आरक्षणासाठी तुमची भूमिका काय ? असा सवाल आंदोलकांनी विचारला.
काही दिवसापूर्वी श्रीजया चव्हाण यांना देखील मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. लोकसभा निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना ही मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाड्याचा ताफा अडवला होता. भाजपकडून ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
लोकसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा मुद्दयावरून आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना अडवले होते. मराठा आरक्षणासाठी आपण गप्प का?, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे प्रश्न करत मराठा बांधवांनी लोकसभा घोषणाबाजी केली होती. यावेळी, त्यांनी काही वेळ आपली सभा थांबवून त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर आता त्यांच्या पत्नीला मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.