Guardian Minister Sandipan Bhumre News Sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre On Danve's Allegation: दानवेंच्या आरोपावर भुमरे म्हणाले, टॅब खरेदी आधीच आरोप हास्यास्पद..

Maharashtra Political News: भुमरेंच्या खात्याशी संबंधित या घोटाळ्याची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चौकशी करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Shivsena : मनरेगा अंतर्गत टॅब खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीच्या निविदा काढण्यात आल्या असल्या तरी अद्याप प्रत्यक्षात खरेदी झालेली नाही. (Minister Bhumre Reply On Danves Allegation) असे असतांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोप करणे हास्यास्पद आहे. राजकीय द्वेषातून हे आरोप केले आहेत, असे प्रत्युत्तर रोजगार हमी योजना तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिले आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये यांना काही करता आले नाही, आता शिंदे-फडणवीस सरकार वेगाने जनतेसाठी काही करत आहेत, तर हे त्यात देखील आडकाठी आणू पाहत आहेत, असेही भुमरे म्हणाले. (Shivsena) विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल मनरेगा अंतर्गत शासनाने २६ हजार २५० टॅब खरेदीसाठी काढलेल्या निविदेत घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता.

सदर निविदा प्रक्रिया रद्द करून विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, तसेच दोषी आढळणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी देखील दानवे यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. (Eknath Shinde) संबंधित विभागाचे सचिव नंद कुमार हे परवा निवृत्त होत आहेत, त्यांनी निविदा काढण्याचा सपाटा लावला आहे. (Marathwada) रोजगार हमी योजनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या खात्यात ही निविदा काढण्यात आली आहे.

२६ हजार २५० टॅब खरेदीसाठी ७० कोटी रूपयांची खरेदी निविदा काढली गेली आहे. (Marathwada) त्या टॅबमध्ये जीआयएस मोबाईल ऍपप्लिकेशनचा समावेश असावा, अशी अट टाकण्यात आली आहे. वास्तवित केंद्र सरकारने हे मोबाईल ऍपप्लिकेशन मोफत उपलब्ध करून दिलेले असताना यासाठी ३५ कोटी रूपयांचा खर्च का करण्यात आला? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. १ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार ५ कोटींपेक्षा जास्त रक्कमेच्या निविदा काढण्यासाठी उच्चाधिकार समितीची परवानगी घेणे आवश्यक असताना या टॅब खरेदीसाठी परवानगी का घेतली नाही.

सचिवांना १ ते ५ कोटी मर्यादेत निविदा काढण्याचे अधिकार असताना ७० कोटींची निविदा काढण्यात आली त्याचे कारण काय? असे प्रश्न दानवे यांनी उपस्थित केले आहेत. सचिव नंदकुमार निवृत्त होणार असल्याने अवघ्या ११ दिवसांत निविदा काढली गेली असल्याकडे दानवे यांनी लक्ष वेधले. या आरोपांना प्रत्युत्तर देतांना भुमरे यांनी मात्र टॅब खरेदी झालेली नसतांना भ्रष्टाचाराचे आरोप हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. परंतु दानवे यांच्या आरोपांना भुमरे यांनी सविस्तर उत्तर मात्र दिलेले नाही. त्यामुळे आता भुमरेच्या खात्याशी संबंधित या घोटाळ्याची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चौकशी करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT