Abdul Sattar News : सत्तार मुख्यमंत्र्यांचे लाडके, सिल्लोडमध्ये शासकीय मका संशोधन केंद्राला मंजुरी..

Shivsena : मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.
Minister Abdul Sattar News
Minister Abdul Sattar Newssarkarnama

Marathwada : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार सध्या राज्यातील वादावादीत न अडकता आपल्या मतदारसंघात मोठे प्रकल्प आणि त्यासाठी लागणारा निधी कसा अधिकाधिक नेता येईल यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत. (Abdul Sattar News) सत्तार यांनी सध्या आपल्या स्वभावाला काहीशी मुरड घातल्याचे देखील दिसून येते. ऐरवी कुठल्याही वादात उडी घेवून बिनधास्त मते मांडणारे सत्तार सध्या माध्यमांशी अंतर राखून आहेत.

Minister Abdul Sattar News
Eknath Shinde Help Shivsainik : ...आणि बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाच्या मदतीला मुख्यमंत्री शिंदे धावले!

या उलट मुख्यमंत्री आणि आपल्या खात्याशी संबंधित प्रकल्प आणि त्यासाठी लागणारा निधी मतदारसंघात कसा आणता येईल यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून सिल्लोड येथे शासकीय मका संशोधन केंद्राला राज्य सरकारने मंजुरी देत त्यासाठी २२ कोटी १८ लाखांचा निधी देखील दिला आहे. (Abdul Sattar) अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.

अकरा महिन्याच्या सरकारमध्ये सर्वाधिक योजना, प्रकल्प आणि त्यासाठी निधी खेचण्यात सत्तार हे राज्यातील इतर कुठल्याही मंत्र्यांपेक्षा सरस ठरले आहेत. (Marathwada) काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा व डोईफोडा येथे शासकीय जागेवर मका संशोधन केंद्र स्थापण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी २२ कोटी १८ लाख इतक्या खर्चास देखील मंजुरी देण्यात आली आहे.

मका संशोधन केंद्रासाठी आवश्यक २१ पदे व बाह्यस्रोताद्वारे १८ पदे निर्माण करण्यात येणार आहे. सत्तार यांनी यासाठी पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्य मंत्री मंडळात याबाबत निर्णय घेण्यात आल्याने मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मक्याच्या उच्च उत्पादन होणाऱ्या वेगवेगळ्या वाणाचं संशोधन येथे होईल. वातावरणाला अनुसरून त्या पद्धतीने मकाचे संशोधन येथे होणार आहे.

त्यामुळे मका पिकाचे उत्पादन क्षमता वाढेल यातून मका उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल. मका पासून मुरघास, स्टार्च यासारखे जवळपास ३५० पदार्थ तयार होतात. सिल्लोड येथील मका संशोधन केंद्रामुळे येथे दर्जेदार मका उत्पादित होईल, त्यातून मका आधारित उद्योग निर्माण होतील, कच्चा माल येथे निर्माण होणार असल्याने येथे प्रक्रिया उद्योग येतील. यातून तालुक्यात उद्योग व्यवसायाला चालना मिळेल तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

Minister Abdul Sattar News
Shambhuraj Desai On Raut : ठाकरे-शिंदे गटाच्या दोन नेत्यांमध्ये आरपारची लढाई; थेट नोटीस पाठवणार...

सिल्लोड तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख २१ हजार ४९७ असून यांपैकी ९८ हजार ७६४ हेक्टर क्षेत्र हे लागवड लायक आहे. यापैकी जवळपास ४० हजार हेक्टरवर मका पीक लागवड होते. मकाचे सर्वाधिक उत्पादन होणारा तालुका म्हणून सिल्लोडची ओळख आहे. त्यामुळे सिल्लोड येथे मका संशोधन केंद्र असावे यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांचा सातत्याने प्रयत्न सुरू होता.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मका संशोधन केंद्र सिल्लोड येथे मंजूर झाले. याकरिता मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. मका संशोधन केंद्रामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी फार मोठा हातभार लागेल, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला आहे .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com