BJP sarkarnama
मराठवाडा

BJP Politics : मराठवाड्यासाठी भाजपचा ‘छत्तीसगड पॅटर्न’, तब्बल 26 नेत्यांवर 'ही' जबाबदारी

Assembly election 2024 BJP Politics Chhattisgarh Pattern : 2019 मधील विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील 46 पैकी 25 जागांवर भाजपने निवडणूक लढली होती. यातील 16 जागांवर विजय मिळवला होता.

Roshan More

BJP Politics : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फटका बसला. विशेष करून मराठवाड्यामध्ये भाजपचा एकही खासदार मराठवाड्यातून विजयी झाला नाही. मराठा आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यात भाजपने सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात 'छत्तीगड पॅटर्न'नुसार प्रचार करत पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. छत्तीसगडमध्ये 26 पेक्षा नेते मराठवाड्यातील मतदारसंघांचा आढाव घेणार आहेत.

2019 मधील विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील 46 पैकी 25 जागांवर भाजपने निवडणूक लढली होती. यातील 16 जागांवर विजय मिळवला होता. तर, 9 जागांवर भाजपचा पराभव झाला होता. यंदा भाजप 2019 प्रमाणेच आपला 25 जागांवर दावा कायम ठेवेल. मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधून आलेल्या नेत्यांवर मराठवाड्यातील भाजपची स्थिती मजबुत करण्याची जबाबदारी असेल.

मतदारसंघाचांचा आढावा छत्तीसगडमधील नेते घेणार आहेत. कुठला मतदारसंघ मजबूत आहे. कुठे उमेदवार बदलण्याची आवश्यकता आहे. स्थानिक मुद्दे काय आहेत यासगळ्याच्या अहवाल हे नेते देणार आहेत. त्यानुसार उमेदवारांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दोन महिने हे नेते सर्व मतदारसंघात फिरून आढावा घेणार आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत छत्तीसगडमधील 11 पैकी 10 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसला पराभूत करत सत्ता मिळवली. त्यामुळे छत्तीसगड पॅटर्नची चर्चा जोरात सुरू होती. त्यामुळे मराठवाड्यात देखील या पॅटर्ननुसार रणनिती वापरत विजय मिळवण्याचा भाजप पक्षश्रेष्ठांचा मानस आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT