Gangrape Case : गँगरेपच्या आरोपीला भाजप आमदाराने भरवला केक; फोटो सोशल मीडियात व्हायरल

IIT-BHU BJP MLA Saurabh Shrivastava : गँगरेप प्रकरणात मागीलवर्षी भाजप आयटी सेलच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.  
BJP MLA  Saurabh Shrivastava
BJP MLA Saurabh ShrivastavaSarkarnama
Published on
Updated on

Varanasi : भाजपच्या आयटी सेलच्या तीन सदस्यांना मागील वर्षी एका गँगरेप प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यापैकी दोघांना हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या जामीन मिळाल्यानंतर भाजप नेत्यांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, केक कापण्यात आल्याचा आरोप आहे.

वाराणसीतील भाजपचे आमदार सौरभ श्रीवास्तव यांचा आरोपींसोबतचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यावरून चर्चांना उधाण आले आहे. कुणाल पांडे आणि अभिषेक चौहान अशी आरोपींची नावे आहे. व्हायरल फोटोमध्ये आमदार दोन्ही आरोपींच्या तोंडाला केक लावताना दिसत आहेत.

BJP MLA  Saurabh Shrivastava
Uddhav Thackeray : उध्दव ठाकरेंच्या घरी जाऊन 2 लाख द्या! हायकोर्टाने कुणाला दिला आदेश, काय आहे प्रकरण?

मागीलवर्षी वाराणसीतील आयआयटी-बीएयू मध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी पांडे, चौहानसह सक्षम पटेल यांना अटक केली होती. त्यापैकी पांडे व चौहान जामीनावर बाहेर आले आहेत. पटलेच्या जामीनावर 16 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. हे प्रकरण त्यावेळी चांगलेच गाजले होते.

आमदारांचा आरोपींसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. त्यावरून विरोधकांकडून भाजपला घेरले जात आहे. आरोपींना जामीन मिळाल्यानंतर आधीपासून टीका होत असताना आता आमदारांचा फोटो समोर आला आहे. दोन्ही आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आल्याचे आरोप केले जात आहेत.

BJP MLA  Saurabh Shrivastava
Nitish Kumar : नितीश कुमारांच्या पक्षात कलह; बड्या नेत्यानं दिला पदाचा राजीनामा

दरम्यान, भाजप आमदारांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हा फोटो पाच वर्षांपूर्वीचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. फोटो कोरोना काळातील आहे. आपण मास्क लावल्याचे फोटोमध्ये दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कार्यकर्ता कुटुंबाचा सदस्य असतो. आपण एका कार्यक्रमात गेलो होतो. तिथे केक कापावा लागला होता. तिन्ही आरोपींशी आपला कोणताही संबंध नाही, असे आमदार श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com