Devendra Fadnavis and Pankaja Munde sarkarnama
मराठवाडा

BJP News : चर्चा तर होणारच! ; फडणवीसांच्या कार्यक्रमाला मुंडे भगिनींची दांडी

Pankaja Munde : फडणवीस यांच्या बीडमधील कार्यक्रमाकडे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे आणि पाठ फिरवल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामा ब्युरो

Pankaja Munde : शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) उपस्थित होते. मात्र, भाजप नेत्या, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde)यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते.

मुंडे भगिनींच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा मुंडे या फडणवीसांवर नाराज आहेत का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. फडणवीस यांच्या बीडमधील कार्यक्रमाकडे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे आणि पाठ फिरवल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

काही महिन्यापूवी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा यांना भाजपने विधान परिषदेवर आमदारकीची संधी नाकारली गेली. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे स्थान दिलं जाईल, अशी अपेक्षा होती. तीही फोल ठरली. तेव्हा मुंडे भगिनी या भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, आता त्याच जुन्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळं पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी पक्षातील पदांचे राजीनामे देऊ केले होते. पंकजा यांनी समर्थकांची समजूत काढली असली तरी त्यांची स्वत:ची नाराजी लपून राहिलेली नाही. समर्थकांसमोर केलेल्या भाषणातून ही नाराजी उघड झाली आहे. पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय कार्यकारणीत वर्णी लागली असली तरीही त्या अजून नाराज आहेत का ? अशा चर्चा यानिमित्ताने सुरु झाल्या आहेत.

फडणवीस अन् पंकजा मुंडे यांच्यामध्ये म्हणावे तसे राजकीय सख्य नसल्याच्या सर्वश्रृत आहे. ही नाराजी यापूर्वीही दोघांनी आपल्या भाषणामधून व्यक्त केली आहे. आजच्या कार्यक्रमाला मुंडे भगिनी गैरहजर राहिल्याने यात आणखी भर पडली आहे. आता याला मुंडे भगिनी काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आज फडणवीस यांनी आपल्या भाषणात युवकांना आवाहन केले."31 डिसेंबरला काही जण दारू पिऊन धिंगाणा, भांडणे करतात. चरस-गांजा पितात. रात्री लोकांनी दारू नव्हे तर मसाला दूध पिऊन नववर्षाची सुरुवात करायला हवी. या उदात्त हेतूने विनायक मेटेंनी अभियानास सुरुवात केली. मात्र, मी त्यावेळी येऊ शकलो नाही. दुर्दैवाने आज विनायक मेटे नसताना मी या कार्यक्रमाला आलो. जेव्हा ज्योती मेटे म्हणाल्या मी हा कार्यक्रम पुढे सुरू ठेवत आहे. त्यावेळी मला खूप आनंद झाला. मेटेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत," असे फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT