Bjp State President Chandrashekar Bawankule News, Aurangabad
Bjp State President Chandrashekar Bawankule News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

BJP News : भारत जोडो दरम्यान, दीड हजार काॅंग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये आले ; आता मोठे धक्के..

सरकारनामा ब्युरो

Chandrashekar Bawankule On Bharat Jodo: काॅंग्रेस पक्षाची अवस्था वाईट झाली आहे, तिथे आता कोणीही थांबायला तयार नाहीत. राहूल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू असतांना दीड हजार काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रेवश केला, असा दावा (Bjp) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. येत्या काही दिवसांत काॅंग्रेससह इतर पक्षांना मोठे धक्के बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठवाडा (Marathwada) शिक्षक मतदारसंघाचे भाजप उमेदवार किरण पाटील यांचा उमेदवारी अर्ज आणि शिक्षक मेळाव्याच्या निमित्ताने बावनकुळे (Chandrashekar Bawankule) औरंगाबादेत आले आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी प्रवेशाचे मोठे बाॅम्बस्फोट येत्या काही काळात होणार असल्याचा गौप्यस्फोट केला.

बावनकुळे म्हणाले, काॅंग्रेसची सध्या दयनीय अवस्था झाली आहे, या पक्षात राहून आपले भले होणार नाही हे आता प्रत्येकाला वाटू लागले आहे. भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रात दाखल झाली तेव्हाच दीड हजार काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे यापुढे आणखी मोठी आणि धक्कादायक नाव तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या यादीत दिसतील.

अनेकांचा पक्षप्रेवश निश्चित झाला आहे, फक्त वेळ आणि ठिकाण ठरायचे बाकी आहे. ते लवकरच ठरेल आणि भाजपमध्ये मोठ्या नेत्यांचा प्रवेश झालेला तुम्हाला दिसेल. शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत का? या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची नाराजी नाही, मी स्वतः रोज मुख्यमंत्र्यांशी बोलतो, सगळे उमेदवार हे त्यांच्याशी चर्चा करूनच ठरवण्यात आले आहेत, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT