Latur News : अमित-धीरज हे प्रिन्स, आम्हाला ते नकोत ; भाजप प्रवेशावर निलंगेकर स्पष्टच बोलले..

Marathwada : चुकीच्या कामांवर पडदा टाकावा, त्याची कुठे चर्चा, चौकशी होवू नये, यासाठीच अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात.
Amit Deshmukh-Sambhaji Patil Nilangekar News, Latur
Amit Deshmukh-Sambhaji Patil Nilangekar News, LaturSarkarnama

Sambhaji Patil Nilangekar : अमित देशमुख, धीरज देशमुख हे प्रिन्स आहेत. आम्हाला असे प्रिन्स नकोत, तर जनतेची कामं करणारे लोक हवे आहेत. या दोघांच्या (Bjp) भाजप प्रवेशाच्या चर्चा म्हणजे आपण केलेल्या चुकीच्या कामांवर पांघरून घालण्यासाठीचा प्रयत्न आहे. ते काही भाजपमध्ये यते नाहीत, आणि आम्ही त्यांना घेत नाहीत, अशा शब्दात माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख, धीरज देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या अफवा असल्याचे सांगितले.

Amit Deshmukh-Sambhaji Patil Nilangekar News, Latur
Tanaji Sawant : रस्त्यांची सगळी कामे सावंतांच्या मतदारसंघात, तरी सत्ताधारी, विरोधी आमदार गप्प..

लातूर येथे भाजप युवा संवाद मेळाव्यात बोलतांना निलंगेकरांनी अमित-धीरज देशमुख (Amit Deshmukh) यांच्यावर टीका केली. जिल्ह्याच्या राजकारणात संभाजी पाटील निलंगेकर आणि देशमुख बंधुंमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. संधी मिळेल तेव्हा (Sambhaji Patil Nilangekar) निलंगेकर या दोघांवर टीका करत असतात. एमआयडीसीतील भूखंड प्रकरण असो, की जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील कर्ज वाटपातील गैरव्यवहार अशा अनेक मुद्यांवरून निलंगेकर त्यांच्यावर टीका करत असतात.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता निलंगेकरांनी देशमुख विरोधातील धार अधिक तेज केली आहे. युवा संवाद मेळाव्यात, अमित आणि धीरज देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर निलंगेकरांनी स्पष्ट भाष्य केले. निलंगेकर म्हणाले, अमित आणि धीरज देशमुख हे प्रिन्स आहेत. आम्हाला अशा लोकांची पक्षात गरज नाही, आम्हाला जनतेची कामे करणारे लोकं पाहिजेत.

आपण केलेल्या चुकीच्या कामांवर पडदा टाकावा, त्याची कुठे चर्चा, चौकशी होवू नये, यासाठीच अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. प्रत्यक्षात अमित-धीरज हे काही भाजपमध्ये येत नाहीत, आणि आम्ही काही त्यांना घेत नाही. त्यामुळे यावर अधिक चर्चा करण्याची गरज नसल्याचेही निलंगेकर म्हणाले.

राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी लातूरचे देशमुख कधीही फडणवीसांच्या मांडीवर जावून बसतील, असे विधान केले होते. तेव्हापासून अमित व धीरज देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com