Bjp Leader Pankaja Munde-Devendra Fadanvis News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad News: फडणवीसांना ताप, पण पत्रिकेवर नाव नसूनही पंकजा मुंडे सभेला हजर..

BJP News : फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बीड दौऱ्यापासून पंकजा लांब राहिल्याच्या चर्चामुळे राजकीय वातावरण तापले होते.

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : भाजपच्या मिशन लोकसभेला चंद्रपूर आणि मराठवाड्याची राजधानी औरंगाबादेतील राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सभेने झाली. उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही सभेला अंगात ताप भरल्यामुळे उपस्थीत राहू शकले नाही. तर दुसरीकडे (Bjp)भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप करत त्यांच्या समर्थकांनी पक्षातील नेत्यांवर टीकास्त्र सोडले.

इकडे औरंगाबादच्या (Aurangabad) जाहीर सभेसाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत पंकजा मुंडे यांचे नाव नसल्याचा प्रकार समोर आला आणि पुन्हा एकदा त्यांना डावलले जात असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु चंद्रपुरमध्ये न दिसलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) औरंगाबादच्या जाहीर सभेत मात्र पत्रिकेवर नाव नसूनही सहभागी झाल्या. फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बीड दौऱ्यापासून पंकजा लांब राहिल्याच्या चर्चामुळे राजकीय वातावरण तापले होते.

त्यातच औरंगाबाद येथील राष्ट्रीय अध्यक्षांच्या जाहीर सभेच्या निमंत्रण पत्रिकेत देखील पंकजा यांचे नाव नव्हते. त्यामुळे भाजपचे लोकसभा मिशन सुरूवातीलाच वादात सापडल्याचे चित्र पहायला मिळाले. परंतु त्यानंतर पडद्यामागे घडलेलेल्या घडामोडीनंतर नाराजी नाट्यावर पडदा टाकण्यात अध्यक्ष नड्डांना यश आले.

एकीकडे फडणवीस ताप असल्यामुळे चंद्रपूर आणि औरंगाबाद येथील जाहीर सभेला उपस्थीत राहू शकले नाहीत. तर दुसरीकडे औरंगाबादच्या सभेला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आता फडणवीस नव्हते म्हणून पंकजा आल्या का? असा सवाल देखील उपस्थीत केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT