Sudhakar Bhalerao Sarkarnama
मराठवाडा

Sudhakar Bhalerao:मराठवाड्यात शरद पवारांचा भाजपला 'दे धक्का'; माजी आमदार 'कमळ' सोडून हाती घेणार 'तुतारी'

BJP Latur Former MLA Sudhakar Bhalerao Will Join NCP Sharad Pawar Droup: सुधाकर भालेराव हे ११ जुलै रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात 11 जुलै रोजी प्रवेश करणार आहेत. भालेराव यांच्या या प्रवेशाने भाजपला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

BJP Latur NEWS: लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने भाजपला खिंडार पाडण्याचे सत्र सुरु केले आहे. छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे माजी महापौर राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गळाला भाजपचा बडा मासा लागला आहे.

भाजपाचे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती साम टीव्हीने दिली आहे.

मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटर येथे सुधाकर भालेराव हे ११ जुलै रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात 11 जुलै रोजी प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.भालेराव यांच्या या प्रवेशाने भाजपला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे.

मुंबईत शरद पवार,जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत माजी भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे पक्ष प्रवेश करणार आहेत. राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात सुधाकर भालेराव हे शरदचंद्र पवार पक्षातून अर्थात महाविकास आघाडीतून उदगीर विधानसभा मतदारसंघात मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT