Ramesh Pokale manoj Jarange Patil  sarkarnama
मराठवाडा

Ramesh Pokale : भाजपच्या नेत्याने मागितली मनोज जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी

Ramesh Pokale manoj Jarange Patil : पक्षात अनेक वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ढावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना पद दिली जात आहे. भाजपमध्ये खदखद मोठ्या प्रमाणात आहेत, असे रमेश पोकळे म्हणाले.

Roshan More

Ramesh Pokale News : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या निर्णयाच्या आधी विविध पक्षातील नेते त्यांची भेट घेत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये भाजपच्या नेत्यांचा देखील समावेश आहे.

भाजपचे किसान मोर्चाचे उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत बीड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची मागणी केली. पोकळे यांनी भाजपकडून पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती.

रमेश पोकळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मी राजकीय क्षेत्रात काम करत असलो तरी मराठा समाजाच्या चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. राजकीय पक्षांनी मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक केली आहे. सरकारकडून जे शब्द मनोज जरांगे पाटील यांनी दिले होते पाळले गेले नाहीत. त्याची चालढकल समाज पाहतो आहे. त्यामुळे समाज म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपवर नाराजी

पोकळे यांनी भाजपवर असणारी नाराजी देखील बोलून दाखवली. पक्षात अनेक वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ढावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना पद दिले जात आहे. भाजपमध्ये खदखद मोठ्या प्रमाणात आहे. अचानक कुठल्या पक्षात आलेल्यांना पद देण्याचे काम केले जात आहे. प्रवक्ते केले जात आहे, असे पोकळे म्हणाले.

मनोज जरांगे जाहीर करणार भूमिका

मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढून मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला इशारा दिला. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे की नाही याचा निर्णय 29 ऑगस्टला मनोज जरांगे घेणार होते. मात्र, विधानसभा निवडणूक एक महिना लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आपला निर्णय 29 ऑगस्टला मनोज जरांगे जाहीर करणार नाहीत. याविषयी चर्चा करून लवकरच नवीन तारीख सांगण्यात येईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT