Assembly Election 2024 : काश्मीरमध्ये भाजपची वाट खडतर; राहुल गांधींनी थेट अब्दुल्लांचे घर गाठत घेतला मोठा निर्णय...

Rahul Gandhi Jammu and Kashmir National Conference : राहुल गांधी यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांच्या घरी जाऊन आघाडीची चर्चा केल्याचे समजते.
Rahul Gandhi, Omar Abdullah
Rahul Gandhi, Omar AbdullahSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. काँग्रेसने आपला जुना भिडू नॅशनल कॉन्फरन्स (NC) सोबत आघाडी करण्याचे संकेत देत भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. त्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरूवारी थेट फारुख अब्दुल्ला यांचे घर गाठले.

जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेस भाजपसह नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी या पक्षांनी कंबर कसली आहे. सुरूवातील सर्वच पक्षांनी एकला चलोची भूमिका घेतली होती. पण आता काँग्रेस आणि एनसी हे दोन पक्ष एकत्र येऊन भाजपशी दोन हात करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Rahul Gandhi, Omar Abdullah
Dushyant Chautala : भाजपचा आणखी एक जुना मित्रपक्ष फुटीच्या उंबरठ्यावर; अनेक नेत्यांनी सोडली साथ

राहुल गांधी आज काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आघाडीबाबत संकेत दिले होते. कार्यकर्त्यांना सन्मान राखून आघाडी केली जाईल, असे ते म्हणाले होते. त्यानंतर राहुल यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासोबत थेट माजी मुख्यमंत्री अब्दुल्ला यांचे घर गाठले. या भेटीदरम्यान दोन्ही पक्षांतील आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अब्दुल्ला म्हणाले, 'आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आज सांयकाळपर्यंत हे स्पष्ट होईल. सर्व 90 जागांवर आघाडी होईल.' हे दोन पक्ष एकत्र आल्यास राज्यातील राजकारणाला कलाटणी मिळेल, असे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.

Rahul Gandhi, Omar Abdullah
Suresh Gopi : अ‍ॅक्टिंगसाठी परवानगी द्या! मंत्र्यांच्या विनंतीला अमित शाहांचा रेड सिग्नल, अभि’नेत्या’ची सेटवरच सेटिंग...

निवडणूक महत्वाची

जम्मू आणि काश्मीरमधील निवडणूक अनेक अर्थांनी महत्वाची बनली आहे. पाच वर्षांपूर्वी राज्यातील 370 कलम हटवण्यात आले. लडाख स्वतंत्र करून काश्मीरलाही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. 2018 पासून राज्यात राज्यपाल कामकाज पाहतात. 2014 नंतर म्हणजे दहा वर्षांनी राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. प्रामुख्याने भाजपसाठी ही निवडणूक कलम 370 हटवण्याचा निर्णय योग्य होता की नाही, हे सांगणारी ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com